• Download App
    पुण्यातील तरुणाई हनी ट्रॅपच्या जाळ्यात; न्यूड व्हिडिओ फेसबुक फ्रेंड्सना पाठविण्याची धमकी, 2 गुन्हे, 150 तक्रारी । Pune youth caught in honey trap; Threatening to send nude videos to Facebook friends, 2 FIRs, 150 complaints

    पुण्यातील तरुणाई हनी ट्रॅपच्या जाळ्यात; न्यूड व्हिडिओ फेसबुक फ्रेंड्सना पाठविण्याची धमकी, २ गुन्हे, १५० तक्रारी

    Pune youth caught in honey trap : कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील तरुणाईला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवल्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांत दोन गुन्हे आणि तब्बल 150 तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही तरुणींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. नंतर त्यांच्याशी प्रायव्हेट चॅटिंग वाढवून त्याचे व्हिडिओ चित्रण केले जात आहेत. यानंतर ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. Pune youth caught in honey trap; Threatening to send nude videos to Facebook friends, 2 FIRs, 150 complaints


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील तरुणाईला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवल्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांत दोन गुन्हे आणि तब्बल 150 तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही तरुणींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. नंतर त्यांच्याशी प्रायव्हेट चॅटिंग वाढवून त्याचे व्हिडिओ चित्रण केले जात आहेत. यानंतर ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

    जाळ्यात अडकलेल्या तरुणांनी पैसे न दिल्यास त्यांचे व्हिडिओ फेसबुक फ्रेंड्सना पाठवण्याची धमकीही दिली जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत अनेक तरुणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

    गुन्हेगारांकडून सोशल मीडियावरील व्यक्तींचे फेसबुक अथवा इतर अकाऊंट तपासले जाते. त्यावरील फोटो, माहिती आणि पोस्ट यावरून त्यांच्या आवडीनिवडी पाहिल्या जातात. यासोबतच त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये जाऊन त्यांचे वर्तुळही तपासले जाते. यानंतर पुरेशी माहिती जमा होताच अशा तरुणांना लक्ष्य करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मग हळूहळू इनबॉक्समध्ये चॅटिंग केली जाते. यानंतर अत्यंत खासगी संवाद सुरू करत आक्षेपार्ह बाबींपर्यंत मजल जाते. यात ज्या तरुणांचे प्रायव्हेट व्हिडिओ शूट झाले त्यांना त्या आधारे ब्लॅकमेल केले जात आहे. जाळ्यात अडकलेल्या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी होते. पैसे द्यायला नकार दिला तर हेच आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जाते.

    पुण्यात आतापर्यंत असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत, तर 150 पेक्षा जास्त तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. यात प्रामुख्याने श्रीमंत आणि मध्यमवर्गीय मुलांना जाळ्यात ओढण्यात आल्याचेही समोर आले आहे. तथापि, काही सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही या प्रकाराला बळी पडली आहेत. बदनामीच्या भीतीने अनेकजण पुढे येत नाहीत. काही जण पोलिसांकडे मदत मागतात परंतु तक्रार द्यायला तयार होत नाहीत. पुणे सायबर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. आरोपी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थानातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

    Pune youth caught in honey trap; Threatening to send nude videos to Facebook friends, 2 FIRs, 150 complaints

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले