• Download App
    पुणे : मंगळवारी पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा ,२१४ जागेसाठी तब्बल ३९,३२३ अर्जPune: Written examination for the post of police constable on Tuesday, 39,323 applications for 214 posts

    पुणे : मंगळवारी पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा ,२१४ जागेसाठी तब्बल ३९,३२३ अर्ज

    परिक्षा केंद्रावर ७९ तब्बल पावणेतीन हजार पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.Pune: Written examination for the post of police constable on Tuesday, 39,323 applications for 214 posts


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मंगळवारी (दि.५ ) पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त २१४ शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा होणार आहे. त्यासाठी परिक्षा केंद्रावर ७९ तब्बल पावणेतीन हजार पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

    त्याशिवाय परिक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व तयारी झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.पोलिस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परिक्षा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



    पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या २१४ पोलिस शिपाई पदासाठी २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार २१४ पदांसाठी तब्बल ३९ हजार ३२३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

    परीक्षार्थी उमेदवारांना ईमेलवर हॉल तिकीटाची लिंक पाठवली जाणार आहे. काही अडचण आहे. काही अडचण आल्यास ९६९९७९२२३०,८९९९७८३७२८,०२०-२६१२२८८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    पोलिसांकडून उमेदवारांसाठी पुढील सूचना

    १) परीक्षेच्या वेळेत मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाहेर ठेवावी लागणार
    २) कोविडच्या पार्श्भूमीवर उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक
    ३) परीक्षेची वेळ संपल्यानंतर पर्यवेक्षकाच्या सूचनेनंतर जागा सोडावी
    ४) हॉल तिकीटसह आधार , पॅनकार्ड ,लायसन्स, पासपोर्ट जवळ बाळगा
    ५) उमेदवारांनी निळे, काळे बॉलपेन वापरावे
    ६) परीक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्र पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागणार.

    मंगळवारी होणाऱ्या परिक्षेच्या पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये अपर पोलीस आयुक्त-२, पोलीस उपायुक्त-८, सहायक पोलीस आयुक्त-१३, पोलीस निरीक्षक-७६, एपीआय-८७, पोलीस उपनिरीक्षक-८०, कर्मचारी-२ हजार ४७८ नियुक्ती करण्यात आली आहे.

    Pune: Written examination for the post of police constable on Tuesday, 39,323 applications for 214 posts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य