विशेष प्रतिनिधी
पुणे : श्रीलंकन गायिका योहानी डी-सिल्व्हा हिच्या ‘मानिके मागे हिथे’ या गाण्याला पुण्यातील वाहतूक पोलिसाने मराठी साज चढविला आहे. सध्या हे मराठी रॅप गाणे सोशल मीडियावर चांगलेच जलवा करत आहे.योहानीच्या या गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील विविध भाषांमध्ये व्हर्जन्स तयार करण्यात आले आहेत.Pune traffic police rap song flashed on social media, Yohani’s song uploaded in Marathi
पुणे शहर पोलीस दलामध्ये काम करीत असलेल्या अतिश खराडे यांनी योहानीच्या या गाण्याला आपल्या शब्दांचा साज चढविला आहे. खराडे हे पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेमध्ये नेमणुकीस आहेत. त्यांना लहानपणापासून गाण्याची आवड आहे.
युट्युबवर त्यांच्या गाण्यांचे अनेक व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत. पोलीस दलातील आणि मित्र परिवारातील स्नेही मंडळींच्या आग्रहाखातर त्यांनी योहानीच्या गाण्यावर स्वतःच्या गाणे तयार करीत ते युट्युब वर अपलोड केले आहे. अल्पावधीतच हे गाणे हजारो नेटकऱ्यांनी लाईक आणि शेअर केले आहे.भारतात तमिळ, तेलगू, हिंदी आदी भाषांमध्ये या गाण्यांचे व्हर्जन गायकांनी तयार केले आहेत.
Pune traffic police rap song flashed on social media, Yohani’s song uploaded in Marathi
हत्त्वाच्या बातम्या
- मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू; 4 जिल्ह्यांत अलर्ट
- Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र केले दाखल, 346 पानांमध्ये 77 जणांचे जबाब
- राजीनाम्यानंतर सिद्धूंचा पहिल्यांदाच खुलासा, म्हणाले- कलंकित नेते परतणे मंजूर नाही, अखेरपर्यंत पंजाबसाठी सत्याची लढाई लढेन
- शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ, ईडीचं समन्स, आधी निकटवर्तीयाला झाली अटक