वृत्तसंस्था
पुणे : कोरोना काळात महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये अस्थाई कोविड हॉस्पिटल्स आणि जंबो कोविड सेंटर उभारण्यात आली होती. त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. या संदर्भात आता प्रत्यक्ष कारवाई सुरू असून पुणे पोलिसांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बिझनेस पार्टनर सुजित पाटकर यांच्या विरोधात फौजदारी कायदा कलम 420 406 465 467 468 471 511 आणि 34 या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.Pune Police files 420 case against Sanjay Raut’s business partner Sujit Patkar in Jumbo Covid Center Scam
सुजित पाटकर यांची लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस आहे या सर्विस विरुद्ध हा गुन्हा नोंदवला असून त्यांच्यासह अनेकांना पोलिसांनी सह आरोपी केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर मधील जंबो कोविड सेंटर उभारण्याचे कंत्राट घेताना आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप सुजित पाटकर यांच्यावर आहे.
भाजपचे व्हिसल ब्लोअर नेते सोमय्या यांनी कागदपत्रांसह पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. आता त्या तक्रारीवरूनच सुजित पाटकर आणि त्यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस वर पुणे पोलिसांनी 420 पासून बाकीची कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी ही बातमी कन्फर्म केल्याचे एएनआय या वृत्त संस्थेने नमूद केले आहे.
Pune Police files 420 case against Sanjay Raut’s business partner Sujit Patkar in Jumbo Covid Center Scam
महत्वाच्या बातम्या
- अतिक अहमदच्या कबरीवर तिरंगा ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- ट्विटरने कोणालाही सोडले नाही! राहुल गांधी, योगींपासून ते शाहरुख-सलमानपर्यंत सर्वांच्या हटवल्या लेगसी ब्ल्यू टिक्स
- भारताच्या लोकसंख्येवर चीनने म्हटले- संख्या नव्हे, गुणवत्ता महत्त्वाची, चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- आमचे 90 कोटी लोक कामाचे, त्यांच्यात टॅलेंटही आहे
- कॉंग्रेसने इतिहास पळवला, स्वत:ला हवा तसा लिहून घेतला; सावरकर स्मारकातून मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल