पुणे-नाशिक महामार्गावर एका मोटारचालकाने मला साईट का दिली नाही म्हणून एसटी चालकाला मारहाण करून महिला कंडक्टरला कारच्या बोनटवर १०० फुटापर्यत फरफटत नेले. खेड तालुक्यात पुणे – नाशिक महामार्गावर तुकाईभांबुरवाडी येथे हा प्रकार घडला.Pune-Nashik highway driver’s arrears, female conductor of ST was taken 100 feet on the bonnet of the car
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर एका मोटारचालकाने मला साईट का दिली नाही म्हणून एसटी चालकाला मारहाण करून महिला कंडक्टरला कारच्या बोनटवर १०० फुटापर्यत फरफटत नेले. खेड तालुक्यात पुणे – नाशिक महामार्गावर तुकाईभांबुरवाडी येथे हा प्रकार घडला.
खेड पोलिस ठाण्यात एसटी बस चालक सदु किसन भालेराव (वय. ४३) या चालकाने एसटी चालकाने फिर्याद दिली. राजगुरुनगर आगाराची एस बस तुकाईभांबुरवाडी दरम्यान पुणे – नाशिक महामार्गावरून मंचर दिशेला जात होती. दरम्यान एसटी बसला मागून ओव्हर टेक करणाºया मोटारीने एसटी बसला आडवी उभी केली.
मोटारीतून लाकडी काठी काढून एसटीची समोरील काच फोडली. चालक बाजूचा दरवाजा उघडून चालकाला मारहाण केली. त्यावेळी एसटी बस वरील कंडक्टर सारिका चिंचपुरे त्या चालकास तुम्ही असे करू नका आम्ही ऑन डयुटी आहेत, असे म्हणाल्या. त्यावर मोटारचालकाने मला साईड का दिली नाही, मला एक मर्डर करण्याचा आधिकार आहे.
मी तुमच्या दोघाकडे बघून घेतो मी कोण आहे हे तुम्हाला दाखवितो, असे म्हणून निघून जाऊ लागला. दरम्यान कंडक्टर चिंचपुरे यांनी आमचे आधिकारी येईपर्यंत चालकास थांबण्याची विनंती केली.परंतु तो न थांबता निघून जाऊ लागला. म्हणून वाहक चिंचपुरे यांनी मोटारीच्या समोरील एक वायपर धरल्यावर त्याने कार थांबवली नाही.
चिंचपुरे यांना जवळपास शंभर फुटापर्यंत परफटत नेले. रस्त्याने जाणारे दुस-या गाडी वरील लोक हे मोठयाने ओरडल्याने त्याने कार थांबवली. वाहक चिंचपुरे खाली उतरल्यानंतर तो तिथुन पुढे मंचर बाजुकडे निघून गेला.
अज्ञात चालका विरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण शिविगाळ,दमदाटी करून एस.टी बसची काच फोडली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फरारी कार चालकाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षाराणी घाटे करित आहे.
Pune-Nashik highway driver’s arrears, female conductor of ST was taken 100 feet on the bonnet of the car
महत्त्वाच्या बातम्या