नवीन वर्षाच्या सणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे राज्य आणि स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु आहे.Pune Municipal Corporation announces new rules on the backdrop of Christmas.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे १३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे.दरम्यान ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्य आणि स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु आहे. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
अशी असेल नियमावली
१)ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता नाताळ सण साधापणाने साजरा करा.
२) सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे, मास्कचा वापर करावा.
३) चर्चमध्ये प्रार्थनेसाठी केवळ 50 टक्के उपस्थिती बंधनकारक
४) चर्च आणि इतर ठिकाणी गर्दी करु नका.
५)चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आयसह अन्य सजावट केल्यास गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करा.
६) चर्चबाहेर स्टॉल किंवा दुकान लावण्यास बंदी.
७)मिरवणुका आणि फटाक्यांच्या आतषबाजीवरही बंदी.
Pune Municipal Corporation announces new rules on the backdrop of Christmas
महत्त्वाच्या बातम्या
- इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर काव्यात्मक हल्लाबोल
- कोरोनापासून सुरक्षेसाठी फायझरच्या कोविड गोळीला मंजुरी
- उत्तरप्रदेशात रॅलीवर बंदी घाला , विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलण्याचे अलाहाबाद हायकोर्टाचे मोदींना आवाहन
- सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ,उदयनराजे झाले भावूक; म्हणाले…