• Download App
    पुण्यात कोरोनाविरोधी लस आहे; पण, सिरींज नाहीत १७ हजार डोस उपलब्ध असताना द्यायचे ते कसे ?; महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच|Pune has anti-corona vaccine; But, how to give 17,000 doses when there are no syringes ?; A big dilemma for the municipal administration

    पुण्यात कोरोनाविरोधी लस आहे; पण, सिरींज नाहीत १७ हजार डोस उपलब्ध असताना द्यायचे ते कसे ?; महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात कोरोनाविरोधी लस उपलब्ध आहे; पण सिरींज नाहीत. सध्या १७ हजार डोस उपलब्ध असताना ते द्यायचे कसे ?, असा नवा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे उभा टाकला आहे.Pune has anti-corona vaccine; But, how to give 17,000 doses when there are no syringes ?; A big dilemma for the municipal administration

    ‘दात आहेत पण, चणे नाहीत.’ ‘चणे आहेत पण, दात नाहीत,’ अशी काहीशी परिस्थिती महापालिका प्रशासनाची कोरोनाविरोधी लस देताना सिरींज नसल्यामुळे झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लसीचे डोस दिले. पण, पर्याप्त सिरींजच पूरविल्या नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. अनेक केंद्रावरचे लसीकरण ठप्प झाले आहे.



    महापालिका प्रशासनाकडे सध्या १७ हजार कोरोनाविरोधी लसीचे डोस उपलब्ध आहेत. पण, सिरींज नसल्याने ते टोचायचे कसे ?, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांना दुसरा डोस घ्यायचा आहे तर अनेकजण पहिल्या डोस घेण्यासाठी तयार आहेत.

    पण, सिरींज उपलब्ध नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. दुसरीकडे सिरींजच्या तुटवड्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या समस्येवर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे. या मुद्यावर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

    Pune has anti-corona vaccine; But, how to give 17,000 doses when there are no syringes ?; A big dilemma for the municipal administration

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा