एका बांधकाम व्यवसायिकाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केलेल्या दाेन कामांचे बिलांचे मंजुरीकरिता बिलाच्या १५ टक्के रकमेची लाचेची मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी मागितली हाेती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याप्रकरणी सापळा रचून संबंधित दाेन अभियंत्याना अटक करुन त्यांच्या विराेधात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.Pune anti-corruption bureau arrested two engineer of krushi utpanna bajar samiti, they demanded २ lakh rupees bribe
विशेष प्रतिनिधी
पुणे – एका बांधकाम व्यवसायिकाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केलेल्या दाेन कामांचे बिलांचे मंजुरीकरिता बिलाच्या १५ टक्के रकमेची लाचेची मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी मागितली हाेती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याप्रकरणी सापळा रचून संबंधित दाेन अभियंत्याना अटक करुन त्यांच्या विराेधात लाच मागितल्याचा गुन्हा स्वारगेट पाेलीस ठाण्यात दाखल केला आहे. Pune anti-corruption bureau arrested two engineer of krushi utpanna bajar samiti, they demanded २ lakh rupees bribe
कृषी उत्पन्न बाजार समिती गुलटेकडी पुणे येथील कार्यकारी अभियंता प्रमाेद कृष्णराव तुपे (वय-५४) आणि उपअभियंता अरविंद दामाेदर फडतरे (४२) अशी याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे. याबाबत बांधकाम व्यवसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली हाेती.
सदर बांधकाम व्यवसायिकाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील स्वच्छतागृहाचे नुतनीकरण व उद्याेग भवन क्रमांक एक येथील स्लॅबचे वाॅटर प्रुफिंगचे काम केले हाेते. या दाेन कामांचे बिलांचे मंजुरीकरिता बिलाच्या १५ टक्के रकमेची लाच मागणी केली हाेती. याबाबतच्या तक्रारीची पडताळणी एसीबीने केली असता,
संबंधित दाेन कामांचे बिलांचे मंजुरीकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी दाेन लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने सदर दाेघां विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पुणे एसीबीचे पाेलीस अधिक्षक राजेश बनसाेडे,अपर पाेलीस अधीक्षक सुरज गुरव, पाेलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील,सुहास नाडगाैडा, पाेलीस उपअधीक्षक विजयमाला पवार यांचे पथकाने केली आहे. याबाबत पुढील तपास पाेलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक करत आहे.
Pune anti-corruption bureau arrested two engineer of krushi utpanna bajar samiti, they demanded २ lakh rupees bribe
महत्त्वाच्या बातम्या
- ४०० लिटर डिझेल चाेरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
- मशिदीवरील भाेंगे चार दिवसात न काढल्यास खळखटयाक; भाेंग्याच्या वादावरुन मनसेत पुण्यात दुफळी
- Modi – Pawar : मोदी – पवार भेटीनंतर मराठी माध्यमांना विश्लेषणाच्या उकळ्या!!
- ऑनलाईन स्टील विक्रीच्या बहाण्याने फसवणुक करणारी टाेळी जेरबंद