pune 14-year-old girl : पुण्यात एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे. त्याचवेळी पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. pune 14-year-old girl gangraped eight accused including rickshawwala arrested
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे. त्याचवेळी पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वानवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आठ जणांवर 14 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना रिक्षाचालकाने तिचा विश्वास संपादन करून अपहरण केले. मग तिला रिक्षात बसवून एका खोलीत नेले, तिथे गेल्यानंतर 8 जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
आरोपींमध्ये 6 रिक्षाचालक आणि चतुर्थ श्रेणीचे दोन कर्मचारी आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी काही तासांतच आठही आरोपींना अटक केली. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली आहे.
पोलिसांनी अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना मेडिकलसाठी पाठवण्यात आले आहे. पीडितेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले.
pune 14-year-old girl gangraped eight accused including rickshawwala arrested
महत्त्वाच्या बातम्या
- थलायवीची वाट पाहत असलेल्या कंगना राणावतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी हिंदीमध्ये प्रदर्शित होणार
- भारतातील दिल्ली, मुंबई ही शहरे सुरक्षित; जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश
- देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल , “आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा”
- पोलिसांना लाठ्यांना तेल लावायला सांगणारे गृहमंत्री अटकेला घाबरत आहेत; राम शिंदे यांचा टोला; पण पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहिती
- महाराष्ट्रासह देश कोरोनाच्या लाटेच्या उंबरठ्यावर – उध्दव ठाकरे; मुख्यमंत्री साहेब, पवारांचे हे ट्विट वाचलेत का…??… वाचा…!!