प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये घडलेल्या कथित वेदोक्त प्रकरणात संदर्भातील काळाराम मंदिरातील पूजेची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली आहे. त्याबाबत कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी सौ. संयोगिता राजे यांनी 30 मार्चला सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट लिहिली आहे, तर महंत सुधीरदास यांनी आज 31 मार्च रोजी त्या संदर्भात स्पष्ट खुलासा केला आहे. Puja and Dakshina on February 10 at Kalaram Temple
श्री काळाराम मंदिरात कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिता राजे यांचा पूजा विधीवरून सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट केली. या संदर्भात महंत सुधीरदास यांनी पूजा संकल्पातील पुराणोक्त या शब्दामुळे राणीसाहेबांचा गैरसमज झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणी लवकरच कोल्हापूर येथे थोरले शाहू महाराज यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्यासमोर निवेदन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दीड महिन्यांपूर्वी 10 फेब्रुवारी रोजी संयोगिताराजे या पूजाविधीसाठी आल्या होत्या. छत्रपती संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काळारामाला पूजा व अभिषेक केला. त्यावेळी मंदिरात त्यांनी केलेल्या पूजेसंदर्भात सोशल मीडिया अकाउंट वरून आज वेदोक्त – पुराणोक्त वादाविषयी पोस्ट लिहिली. या पोस्ट मुळे जुना वेदोक्त बंदी वाद समाज माध्यमांवर आला.
छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी सौ संयोगिता राजे यांनी 10 फेब्रुवारी रोजी श्री काळाराम मंदिरात संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्याच्या अभिषेकाचा व तुलसी अर्चनाचा संकल्प सोडला
काळाराम मंदिराच्या तथाकथित महंतांनी पूजेसाठी पुराणोक्त मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे आपण त्यास ठामपणे विरोध केला. 100 वर्षांनंतरही मानसिकता का बदलली नाही??, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाल्याकडे संयोगिताराजे यांनी लक्ष वेधले.
राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांंना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. परमेश्वराच्या लेकरांना, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरज नाही, असे महंतांना सुनावले. त्यानंतर आपण रामरक्षाही म्हटली. ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात, ती मंदिरे छत्रपतींनी वाचविली. मग छत्रपतींना शिकविण्याचे धाडस करू नका. असे सांगूनही महंतांनी महामृत्यूंजय मंत्र जप केल्यावरून प्रतिप्रश्न केल्याचे संयोगिताराजे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पूजाविधीवेळी उद्भवलेल्या कथित वादावर मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी शुक्रवारी आपली बाजू मांडली. संयोगिताराजे यांनी अभिषेक संकल्प करण्यास सांगितले होते. तो वेदोक्त असायला हवा, असेही त्यांनी सांगितले होते. यावर आम्ही प्रभुरामचंद्रांना वेदोक्तच पूजा अभिषेक केला जातो, असे स्पष्ट केले होते. संकल्प सांगताना श्रुती, स्मृती, पुराणोक्त असे म्हटल्यावर राणी साहेबांनी पुराणोक्त शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला. त्यावेळेस संकल्प करताना त्यात वेदोक्त आणि पुराणोक्त असे काही नसते, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. छत्रपती घराण्याबाबत काळाराम मंदिरातील पुजारी घराण्याला नितांत आदर आहे. वेदोक्त पूजेचा अधिकार नसल्याचे आपण बोललो नाही. छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे महंत सुधीरदास यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती घराणे आणि मंदिराचे पुजारी घराणे यांचे कित्येक पिढ्यांचे संबंध आहेत. वेदोक्त पूजा छत्रपती घराण्याचा अधिकार आहे. उपरोक्त प्रकार गैरसमजातून झाला असावा. कोल्हापूर येथे मोठ्या महाराजांची भेट घेऊन लवकरच गैरसमज दूर केले जातील. संयोगिताराजे या पावणेदोन महिन्यांपूर्वी पूजाविधी करण्यासाठी मंदिरात आल्या होत्या. त्यांनी प्रसाद स्वीकारून 11000 रूपये दक्षिणाही दिली होती, असे महंत सुधीरदास यांनी नमूद केले आहे.
Puja and Dakshina on February 10 at Kalaram Temple
महत्वाच्या बातम्या
- TSPSC Paper Leak : तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवनाथ रेड्डी पोहचले ED कार्यालयात
- गिरीश बापटांच्या निधनानंतर तीनच दिवसांत काँग्रेसच्या वडेट्टीवारांची पोटनिवडणुकीची गडबड; अजितदादांनी संतापून सुनावले!!
- छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल; राज ठाकरेंनी आधीचे केले होते सावध; व्हिडिओ व्हायरल
- संजय राऊत सारखा भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवतो – चंद्रशेखर बावनकुळे