• Download App
    पब, डिस्को, बार चालतात मग गणेशोत्सव का नाही? आशिष शेलारांचा सवाल|Pubs, discos, bars run, so why not Ganeshotsav? Ashish Shelar's question

    पब, डिस्को, बार चालतात मग गणेशोत्सव का नाही? आशिष शेलारांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: पब , डिस्को ,बार  यांना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव  बंदिवासात अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.राज्य शासनाने  गणेशोत्सव साजरा करताना अनेक निर्बंध घातले आहेत.Pubs, discos, bars run, so why not Ganeshotsav? Ashish Shelar’s question

    यावर आशिष शेलार म्हणाले,  गणेशोत्सवावर याहीवर्षी ठाकरे सरकारने जे निर्बंध लादले आहेत ते एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ, मुतीर्कार संघटना वारंवार सरकारशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करीत असताना सरकारने कोणालाही विश्वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली आज जाहीर केली.



    कारखान्यांमध्ये मूर्ती तयार करण्याचे काम चार महिने अगोदरच सुरु होते तेव्हा पासून मूतीर्कार संघटना सरकारला विचारणा करीत होते पण त्याकडे दुर्लक्ष केले. घरगुती गणेशाची मूर्ती 2 फुटाची असा निर्बंध का घालण्यात आला? मग कारखान्यात तयार झालेल्या मूर्तींचे आता काय करणार?

    या सगळ्यावर रोजगार म्हणून विसंबून असलेल्या कारागीर, कारखानदार यांना शासन काय मदत देणार आहे का? गतवर्षी पासून हा उद्योग अडचणीत आहे. त्यांना मदत तर दिली नाहीच पण आता ऐनवेळेस निर्बंध घालून त्यांची कोंडी ठाकरे सरकारने केली आहे. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा.

    शेलार म्हणाले, जर बंधने घालण्यात येणार असतील तर मूर्तीकरांना मदतीचे पॅकेज जाहीर करावे तेही शासनाचे कर्तव्य आहे. गणेशोत्सवातील सर्व घटक आणि राजकीय पक्ष या सर्वांनाच शासनाने पुन्हा या नियमाचा विचार करावा आणि संवादातून मार्ग काढावा असे वाटत आहे. शासन या मागण्या किती मान्य करते ते पाहावं लागणार आहे.

    Pubs, discos, bars run, so why not Ganeshotsav? Ashish Shelar’s question

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस