जनहित याचिका, माहिती अधिकार यांचा गैरवापर करुन लुबाडणूक करण्याचे प्रकार नित्य झाले आहेत. अशाच आरोपांवरून रवींद्र बर्हाटे हा कथित माहिती अधिकार कार्यकर्ता सध्या गजाआड आहे. तसाच आणखी एक इसम आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. Public interest litigation and misuse of the ‘Right to information’ have become commonplace. Ravindra Barhate, an alleged RTI activist, is currently behind bars. Similarly, another so called RTI activist has now been caught by the police.
प्रतिनिधी
पुणे : भ्रष्टाचार विरोधी गांधीगिरी जन आंदोलनाचा सदस्य असल्याचे सांगत जनहित याचिकेद्वारे (पीआयएल) ब्लॅकमेल करत बिल्डरकडे खंडणी मागणारी टोळी पुण्यात उघड झाली आहे. बिल्डरविरुद्ध पीआयएल टाकून ती मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे खंडणीविरोधी पथकाने राजेश बजाजसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज ऊर्फ सचदेव (रा. कमला नेहरु पार्कसमोर, डेक्कन जिमखाना), के. ए. कुरेशी (रा. मलकाजी वाडा, खडकी बाजार), अशोक शंकरराव जाधव (रा. राजा बंगलो, खराडी) आणि बापू गोरख शिंदे (रा. नर्हेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एप्रिल २०१५ ते २४ जुलै २०१९ दरम्यान शिवाजीनगर कोर्ट गेट नं. ३च्या समोरच्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी निखिल केतन गोखले (वय ४७, रा. मयुर कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली. गोखलेंची शशीबिंदु कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यांच्या कंपनीच्या बोपोडीतील बांधकामाची परवानगी चुकीची असल्याचा दावा करीत राजेश बजाज व इतरांनी मुंबई हायकोर्टात दिवाणी अर्ज केला. त्यावेळी तिघांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात तिघांनी २० ते ३० ऑगस्टपर्यंत राजेश बजाज यांना डेंग्यु झाला व त्यांना डॉक्टरांनी ‘बेड रेस्ट’ सांगितल्याचे तसेच के. कुरेशी यांना व्हायरल आजार झाल्याने सुनावणीस हजर राहता आले नसल्याचे नमूद केले. त्यासाठी तिघांनी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट असल्यामुळे कंपनीची व कोर्टाची फसवणुक झाली. तसेच हायकोर्टात जनहित याचिकेची फेरसुनावणी करण्याकरीता केलेल अर्ज मागे घेण्यासाठी ऑगस्ट २०१८ मध्ये शिवाजीनगर कोर्ट गेट नं. ३ च्या समोर रोडवर त्यांनी १ कोटी रुपयांची मागणी करुन, शिवीगाळ करुन कंपनीसह फिर्यादी व फिर्यादीच्या कंपनीचे डायरेक्टर यांना संपवण्याची धमकी दिली होती.
“या चौघांनी जीवे मारण्याची व कंपनीच्या कामकाजात अडथळे आणण्याची धमकी देऊन आमच्या विरोधात विनाकारण न्यायालयात अर्ज करीत होते. त्या भीतीपोटी आम्ही तक्रार दिली नव्हती. परंतु, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे वृत्तपत्रातून समजले. मग आम्ही त्याने दिलेल्या त्रासाबाबत त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलो,” असे गोखले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गोखले यांच्या फिर्यादीनुसार राजेश बजाजसह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रवींद्र नौपतलाल सांकला यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागून जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजेश बजाज व इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. बजाजने बनावट कागदपत्रांद्वारे यापूर्वीही अनेकांची फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी राजेश बजाज विरोधात १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने बजाजला यापूर्वी अटक केली होती.
माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचा भास निर्माण करायचा, टोळी जमवायची, लोकांना धमकावून जमिनी हडपायच्या, लोकांना धमक्या देऊन, ‘ब्लॅकमेल’ करून खंडण्या उकळायच्या असले प्रकार करणारे तथाकथित ‘आरटीआय’ कार्यकर्ते वाढले आहेत. अशाच प्रकारे अनेक गुन्हे नावावर असणारा रवींद्र बर्हाटे व त्याच्या टोळीवर पुण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. बर्हाटे आणि त्याचे साथीदार सध्या तुरुंगात आहेत. तसाच प्रकार बजाजच्या रूपाने उघड झाला आहे.
Public interest litigation and misuse of the ‘Right to information’ have become commonplace. Ravindra Barhate, an alleged RTI activist, is currently behind bars. Similarly, another so called RTI activist has now been caught by the police.
महत्त्वाच्या बातम्या
- जी -20 मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले – अफगाणिस्तानची भूमी दहशतीसाठी वापरू नये, तालिबानने आपले वचन पूर्ण करावे
- जगाला लस पुरवण्याच्या भारताच्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
- ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार
- कर्नाटकातील प्रसिद्ध सौंदत्ती यल्लम्मा मंदिर भाविकांसाठी होणार खुले
- आसाम सरकारने गेंड्याची २५०० शिंगे जाळली, शिंगात काहीही औषधी गुणधर्म नसल्याचे स्पष्ट ; गेंडे वाचवा मोहिमेला चालना देण्यासाठी उपक्रम