विशेष प्रतिनिधी
मुंबई : जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २७ मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना यंदाचा पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचे या महोत्सवात सादरीकरण होणार आहे. Pt. Bhimsen Joshi Memorial Ceremony
जीएसबी सभा, मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्ट यांच्या सहकार्याने दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. येत्या रविवारी २७ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
ज्येष्ठ गायक पं. राम देशपांडे यांची संगीत मैफल होणार आहे. त्यांना सुधीर नायक हार्मोनियम साथ, भरत कामत तबला साथ, माधव पवार पखवाज साथ, रवींद्र शेणॉय मंजिरा साथ करणार आहेत. ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ निवेदन करणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश हेगडे, प्रकाश गंगाधरे, प्रवीण कानविंदे, प्रवीण शिंपी, विनोद सौदागर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष बी.एस. बलिगा, उपाध्यक्ष सच्चीदानंद पडियार, सरचिटणीस गणेश राव, संयोजक के व्ही एन भट, यु. पद्मनाभ पै आदी मंडळींनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याच्या प्रवेशिका महाराष्ट्र सेवा संघ हॉल, मुलुंड येथे सकाळी १०.३० ते संध्या.७ पर्यंत उपलब्ध आहेत.
Pt. Bhimsen Joshi Memorial Ceremony
महत्त्वाच्या बातम्या
- SONU NIGAM : महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या भावाकडून सोनू निगमला धमकी ! आयुक्तांनीच करून दिली होती ओळख …
- काश्मिरी पंडितांची पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव, 1990च्या नरसंहाराची पुन्हा चौकशी करण्याची मागणी
- Yogi Adityanath : योगी मंत्रिमंडळात ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री, स्वतंत्र देव सिंग मंत्री; डॉ. दिनेश शर्मांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी??
- मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते; नीतेश राणे यांचा खळबळजनक आरोप