विशेष प्रतिनिधी
जालना :स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम जालना ते नांदेड परिसरात सुरु आहे. भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी चौपट नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलनास सुरुवात केली. Prosperity Highway Land Acquisition; Farmers’ warning
समृद्धी महामार्गाच्या कामावरुन परतणाऱ्या १३ मजुरांवर काळाचा घाला, टिप्पर उलटल्याने जागीच मृत्यू
आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. २०१३ च्या जीआर प्रमाणे आम्हाला चौपट भरपाई देण्यात यावी, अन्यथा फाशी घेतल्याशिवाय कुठलाही पर्याय उरणार नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांनी दिली आहे.
- चौपट नुकसान भरपाई द्या
- जालना ते नांदेड परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
- आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी
- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम
- भूसंपादनाची प्रक्रिया, चौपट भरपाईची मागणी
- फाशी घेऊन आत्महत्या करण्याची वेळ