• Download App
    इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी ,आळंदी पालिकेचा निर्णय : परगावच्या लोकांकडून कोरोनाचा संसर्गाचा धोका|Prohibition of immersion of bones in the holy Indrayani river in Alandi

    इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी, आळंदी पालिकेचा निर्णय ; परगावच्या लोकांकडून कोरोनाचा संसर्गाचा धोका

    वृत्तसंस्था

    आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी – देवाची (ता. खेड) येथील  पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र, स्थानिकांना अस्थी विसर्जन करता येणार आहे. Prohibition of immersion of bones in the holy Indrayani river in Alandi

    इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनासाठी परगावाहून लोकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनाअस्थी विसर्जनास बंदी घालावी, अशी मागणी होती.



    अखेर शुक्रवारी (ता.२३) पालिकेने आदेश जारी केला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलिस अधिनियम १९५१, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल,

    असे मुख्याधिकारी अंकुश जाधव व वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.

    Prohibition of immersion of bones in the holy Indrayani river in Alandi

    महत्वाच्या’ बातम्या 

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !