राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाच्या या संकटात प्रत्येक जण जमेल ती मदत करण्यासाठी पुढे यात आहे . त्यातच सध्या प्लाझ्मा आणि रक्ताची मोठी गरज राज्याला आहे.यासाठी अनेकजन पुढाकार घेत आहेत.
- प्रिया आणि उमेशला काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या दोघांनी रक्तदान केलं आहे.priya bapat
विशेष प्रतिनिधी
मुंबई: मनोरंजन विश्वातील फेमस जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट ! या जोडीला नेहमीच चाहत्यांची पसंती मिळत असते.प्रिया बापट आणि उमेश कामत यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. दोघांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन झाले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. Priya Bapat and Umesh Kamat donate blood after corona recovery
या दरम्यान ते त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते.
त्यानंतर पोस्ट करत त्यांनी कोरोनामुक्त झाल्याची गुडन्यूज देखील दिली होती. आता पुन्हा एकदा प्रिया बापटची पोस्ट चर्चेत आली आहे.
सकारात्मक ऊर्जा देणारी पोस्ट
नुकतेच अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या आयुष्यात मोठ्या धाडसाने एक काम केले आहे. आजपर्यंत तिने रक्तदान केले नव्हते. सुईची भीती वाटते म्हणून कधीच रक्तदान करण्याची हिंमत होत नव्हती. मात्र पहिल्यांदाच मनात कोणतीही भीती न ठेवता रक्तदान केल्याचा आनंद तिने चाहत्यांसह शेअर केला आहे. रक्तदान केल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त करत एक वेगळेच समाधान मिळाल्याचे सांगितले आहे.
आज पहिल्यांदा रक्तदान केल्यानंतर किमान एक जीव वाचवण्यासाठी मी जे काही करू शकते ते केलं, आता आपल्याला शांत झोप लागणार आहे. रक्तदान हे महादान आहे त्यामुळे प्रिया बापटची ही पोस्ट पाहून इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे .