जेव्हा समाजात आराजकता पसरते, विषमता, अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही Pritam Munde’s call Monday to Sunday, everyone present is part of the Munde family
विशेष प्रतिनिधी
बीड (सावरगाव) : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवानगडावर मोठा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात खासदार प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदा भाषणाला सुरुवात केली. भाषणाला सर्वात झाली की लगेच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी आवाज येत नसल्याची तक्रार केली. त्यावेळी प्रीतम यांनी मंडे टू संडे अशी हाक दिली. त्यावर कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे असं म्हणाले.
भाषण करताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की , “भाषण करु का नको करु? तुम्ही शांत राहिला तर कसं भाषण करणार? लांबलचक भाषणं करायला मला आवडत नाही. आवाज येत नाही? आपला आवाज फक्त बीड जिल्हा किंवा मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला माझा आवाज येत नाहीय?
पुढे प्रीतम मुंडे म्हणाल्या की , “सावरगावच्या गावकऱ्यांचं आभार व्यक्त करते.आज या मेळाव्याला येत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी इतकी अतिवृष्टी झाली की काही लोकांच्या मनात शंका होती की मेळावा होईल का नाही? आणि मेळावा झालं तरी किती मोठा होईल? ज्या लोकांच्या मनात शंका होती त्या लोकांना सांगायचं आहे, जरा डोळे उघडा आणि हा रसाळलेला जनसमुदाय बघा.हा भगवान बाबांचा आशीर्वाद आहे तसेच मुंडे साहेबांच्या संस्कारांचा प्रतिक आहे.आपला मेळावा कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय मेळावा नाही. तर हा मेळावा प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे. इथे आल्यानंतर ऊर्जा मिळते.
पुढे भाषणात प्रीतम मुंडे म्हणाल्या की ,आज दसऱ्याचा दिवस आहे, नवरात्री हा देवीचा सण म्हणून साजरा केला जातो. देवीचे अनेक रुप आपल्याला बघता येतात. देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप आपण बघतो. पंकजा ताई पालकमंत्री असताना हे मायावी, सोज्वळ आणि सहनशीलरुप आपण बघितलंय.आता नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली.
जेव्हा समाजात आराजकता पसरते, विषमता, अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही. याचंसुद्धा हा विजयादशमीचा सण प्रतिक आहे.भाषणात प्रीतम मुंडेंनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
आज इथे आलेला प्रत्येक माणूस मनामध्ये अपेक्षा घेऊन आलाय. मुंडे परिवारासाठी हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. आपला मेळावा कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय मेळावा नाही. तर हा मेळावा प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे. इथे आल्यानंतर ऊर्जा मिळते. आज मंचावर उपस्थित राहिलेले मान्यवर, सकाळपासून आलेले तुम्ही सर्व मुंडे परिवाराचा भाग आहात.
Pritam Munde’s call Monday to Sunday, everyone present is part of the Munde family
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजी भिडेंच वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले – निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान
- भारताच्या संरक्षणाची “सप्तशक्ती”; 7 नव्या कंपन्या ठरतील भारताच्या सैन्यशक्तीचा मजबूत पाया
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- Elgaar Parishad case : वरवरा राव यांना 28 ऑक्टोबरपर्यंत सरेंडर करण्याची गरज नाही – मुंबई उच्च न्यायालय