• Download App
    Prime Minister Modi's Bhumi Pujan project stalled in Maharashtra by Thackeray-Pawar government

    पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलेले प्रकल्प महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारने अडकवले!!… ही पाहा यादी!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही राजकीय चिमटे काढले आहेत. मेट्रोचे काम अर्धवट झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिचे उद्घाटन करणार आहेत. ठीक आहे. आमचा आक्षेप नाही असा पहिला चिमटा त्यांनी काढला आहे.Prime Minister Modi’s Bhumi Pujan project stalled in Maharashtra by Thackeray-Pawar government

    त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे या योजनेचे भूमिपूजन होत आहे, त्या मुठा नदी सुधार योजनेवर पवारांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. मुठा नदीवर किती धरणे आहेत हे मला माहिती आहे. उद्या ढगफुटी होऊन कोणती दुर्घटना झाली, तर धरणातून पाणी सोडावे लागेल. आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरेल. नदीचे पात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली लहान केले तर गावांना त्याचे नुकसान सोसावे लागेल, अशा शब्दांमध्ये पवारांनी मुठा नदी प्रकल्प सुधार योजनेवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधानांनी भूमिपूजन केले तरी महाराष्ट्रातल्या जलसंपदा विभागाला त्याचा आढावा घ्यायला सांगू असे सांगत पवारांनी या योजनेचे भविष्यात नेमके महाविकास आघाडी सरकार काय करणार आहे…??, हेच सूचित केले आहे. एक प्रकारे मुठा नदी सुधार योजनेला राज्यातल्या ठाकरे – पवार सरकार मार्फत अडथळा आणण्याचा किंवा कात्री लावण्याचा प्रकार असल्याचे यातून दिसून येते.


    Pune Metro fare : पुणेकरांसाठी मेट्रोचा प्रवास स्वस्त आणि मस्त… पहा भाडे किती??


    अडकवून ठेवलेले प्रकल्प

    •  पण हा एकमेव प्रकार महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार आल्यानंतर घडलेला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेले अनेक प्रकल्प महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने अडकवल्याचे दिसते.
    •  2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन झाले होते. तो प्रकल्प महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने जवळजवळ बासनात गुंडाळून ठेवला आहे.
    •  इंदू मिलच्या जागेवरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आणि स्मारक या प्रकल्पाची गती कासवा पेक्षाही कमी याच ठाकरे पवार सरकारच्या काळात झाली आहे.
    •  या खेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान सरकारच्या मदतीने सुरु केलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या हद्दीत ठाकरे – पवार सरकारने अडकवून ठेवला आहे.
    •  बुलेट प्रकल्पाचे गुजरातच्या हद्दीतले 80% काम झाले आहे. मध्यंतरी पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाचा आढावाही घेतला. त्यावेळी त्यांनी गुजरात मधील प्रकल्पाचे काम 100% पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
    •  पण बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले मात्र काम कूर्मगतीने सुरू आहे. एक प्रकारे आंतरराष्ट्रीय जपान सरकारने दिलेल्या निधीचा वेळेत वापर करण्यापेक्षा बुलेट ट्रेन प्रकल्प अडवून ठेवण्यात ठाकरे – पवार सरकारने महत्त्व दिल्याचे दिसते.
    •  याखेरीज मुंबईच्या मेट्रो कार शेडचा विषय देखील असाच ठाकरे – पवार सरकारने प्रलंबित ठेवले असे दिसते.

    Prime Minister Modi’s Bhumi Pujan project stalled in Maharashtra by Thackeray-Pawar government

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!