लोकमान्य टिळकांमध्ये तरुणांची क्षमता ओळखण्याची दिव्य दृष्टी होती, असंही मोदींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील सरपरशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक आदींची मंचावर उपस्थिती होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींनी भाषणात लोकमान्य टिळक आणि वीर सावरकरांच्या संबंधाचे उदाहरण दिले. Prime Minister Modi mentioned the relationship between Lokamanya Tilak and Veer Savarkar in his speech
मोदी म्हणाले, ‘’लोकमान्य टिळकांना ही गोष्टा माहीत होतं की, स्वातंत्र्याचे आंदोलन असो किंवा राष्ट्र निर्माणाचे मिशन भविष्याची जबाबदारी नेहमी तरूणांच्या खांद्यावर असते. भारताच्या भविष्यासाठी सुशिक्षित आणि सक्षम तरुणांची निर्मिती आवश्यक होती. लोकामान्य टिळकांमध्ये तरुणांची क्षमता ओळखण्याची दिव्य दृष्टी होती. त्याचं एक उदाहरण आपल्याला वीर सावरकरांशी जुडलेल्या घटनाक्रमातून मिळते.’’
याचबरोबर ‘’त्या काळात सावरकर तरूण होते, टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली. त्यांना वाटत होतं की, सावरकरांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावं आणि परत येऊन स्वातंत्र्यासाठी काम करावं. ब्रिटनमध्ये श्यामजीकृष्ण वर्मा अशाच तरूणांना संधी देण्यासाठी दोन शिष्यवृत्ती चालवत होते. एका शिष्यवृत्तीचं नाव होतं छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती आणि दुसरी महाराणा प्रताप शिष्यवृत्ती होती. वीर सावरकरांसाठी टिळकांनी श्यामजीकृष्ण वर्मांकडे शिफारस केली होती. याचा लाभ घेऊन ते लंडनमध्ये बॅरीस्टर होऊ शकले. अशा कितीही तरूणांना टिळकांनी तयार केलं.’’ असंही मोदींनी यावेळी सांगितलं.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुणेकर आणि महाराष्ट्राचे आभार मानले आणि भाषणातून भावना व्यक्त केल्या, मोदी म्हणाले, “आपल्या देशात काशी आणि पुण्याला विशेष ओळख आहे. पुणे आणि काशीत विद्वत्ता चिरंजीव आहे. येथे विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झाले आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. अशा भूमित सन्मानित होणं यापेक्षा गर्वाची दुसरी गोष्ट नाही. कोणताही पुरस्कार मिळतो तेव्हा आपली जबाबदारीही वाढते. या पुरस्कारासाठी टिळकांचं नाव जोडलं असेल तर दायित्व कित्येक पटीने वाढतं. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मी देशातील १४० देशवासियांच्या चरणी समर्पित करतो.”
Prime Minister Modi mentioned the relationship between Lokamanya Tilak and Veer Savarkar in his speech
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!