विशेष प्रतिनिधी
पुणे : ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या दृष्टीने ट्रस्ट स्थापन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या माध्यमातून गरजूंना मदत दिली जाईल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. Priests should register for e-labor card scheme Publication of Akhil Brahmin Central Organization Calendar
अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिकच्या पुणे केंद्राच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे केंद्र प्रमुख मकरंद माणकीकर,भाजप चे प्रवक्ते व संस्थेचे मार्गदर्शक संदीप खर्डेकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव ,उल्हास पाठक,शिरीष आठल्ये,माधव ताटके,सुवर्णा रिसबूड,पल्लवी गाडगीळ,अनंत खेडलेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माणकीकर यांनी समाज सहाय्यक संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, त्यावेळी पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ट्रस्ट साठी कायमस्वरूपी निधी संकलन करून त्यातील व्याजाच्या उत्पन्नाचा समाजहितासाठी विनियोग करता येईल, असे सांगतानाच मी एक लाख रुपयांचा धनादेश देतो असेही पाटील यांनी जाहीर केले तसेच पुरोहितांनी ई श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी करावी, त्याचा दीर्घकालीन लाभ होईल असेही पाटील म्हणाले.
Priests should register for e-labor card scheme Publication of Akhil Brahmin Central Organization Calendar
महत्त्वाच्या बातम्या
- “2 फेब्रुवारीपर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्यासाठी परवानगी द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करू” – रघुवीर खेडकर
- अहमदनगर आगारातील एसटीच्या 130 कामगारांवर कारवाई होणार, अजूनही संप सुरूच
- “अमोल कोल्हे वैचारिकदृष्ट्या गद्दार निघाले,आम्ही कोल्हे यांना माफ करणार नाही” – संभाजी ब्रिगेड