विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांकडून शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. एसटी कर्मचा-यांनी शरद पवार यांच्या घरावरील केलेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे. Pressure to file charges against Sharad Pawar; Endanger our lives; Allegation of Gunaratna Sadavarten’s wife Jayashree Patel
यानंतर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी माझ्या पतीच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यावर मी गुन्हा दाखल केल्यामुळे शरद पवार हे दबाव तंत्र वापरत असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.
आमच्या जीवाला धोका
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात 600 करोडच्या भ्रष्टाचाराची तक्रार मी दाखल केली आहे. याचा बदला घेण्यासाठी हे शरद पवार यांचं दबाव तंत्र आहे. माझ्या पतीच्या, माझ्या व माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमची ही लढाई आहे, असे सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.
पवारांचे डर्टी पॉलिटिक्स
शरद पवार यांच्या विरोधात सुद्धा मी मलबार हिल पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. सीआयडीने गेल्या आठवड्यात माझा 80 पानांचा जबाब नोंदवला आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझे पती दिवसभर न्यायालयात होते, त्यांना कुठलाही प्रकार माहिती नसताना पोलिसांनी त्यांना बेकायदेशीररित्या अटक केली आहे. शरद पवार हे पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक आरोपही जयश्री पाटील यांनी केला आहे.
सदावर्तेंवर अजामीनपात्र कलमे
गुणरत्न सदावर्ते यांना कलम 120-बी आणि कल्म 353 अंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या कटात सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सदावर्तेंवर लावण्यात आलेली ही दोन्ही कलमे अजामीनपात्र आहेत.
Pressure to file charges against Sharad Pawar; Endanger our lives; Allegation of Gunaratna Sadavarten’s wife Jayashree Patel
महत्त्वाच्या बातम्या
- भारत एक प्रबळ राष्ट्र ; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक
- शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अजिबात समर्थनीय नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा , मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
- सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी परकीय योगदान कायद्यात दुरुस्ती गरजेचीच, सर्वोच्च न्यायालयाने कायद्याला दिली मंजुरी
- जे कर्म करतो, ते या जन्मीच फेडावं लागतं, उदयनराजे यांची शरद पवार यांच्यावर टीका