Tuesday, 6 May 2025
  • Download App
    ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार ; छत्रपती संभाजीराजेंनी ट्विटद्वारे दिली माहिती । President Ramnath Kovind to visit Raigad on December 7; Information given by Chhatrapati Sambhaji Raje through tweet

    ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार ; छत्रपती संभाजीराजेंनी ट्विटद्वारे दिली माहिती

    मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. President Ramnath Kovind to visit Raigad on December 7; Information given by Chhatrapati Sambhaji Raje through tweet


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : ७ डिसेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगडाला भेट देण्याचं निमंत्रण खासदार संभाजीराजेंनी दिलं होत. यासंदर्भात संभाजीराजेंनी एक ट्वीट केलं आहे. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, “राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि.७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.



    दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात राष्ट्रपती सोबत सविस्तर चर्चा केली. याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत आता राष्ट्रपती रायगडाला भेट देणार आहेत.

    President Ramnath Kovind to visit Raigad on December 7; Information given by Chhatrapati Sambhaji Raje through tweet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस