अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतदान करण्यासाठी सपत्नीक आले होते तेव्हा अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.Preparation of oxygen and ventilator started in the state; Information given by Deputy Chief Minister Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने काही निर्बंध घालण्यात आले आहेत.दरम्यान यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले होते.
तसेच अजित पवार यांनी आज राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं आहे.अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतदान करण्यासाठी सपत्नीक आले होते तेव्हा अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला
अजित पवार म्हणाले की, जिल्हा नियोजनातील २० टक्के खर्चाची मान्यता दिली आहे. सगळ्यांनी नियमांचं पालन करावं. मी ५० पेक्षा जास्त लोक असतील तर मी कार्यक्रमाला जाणार नाही. आता मी विचारून कार्यक्रमाला जाणार आहे. आमच्यासहित सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. कारण आम्ही जर पालन केलं नाही तर लोकांना कोणत्या तोंडाने सांगणार.तसेच महाराष्ट्रात सगळ्यांनी लस घ्यावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आहे.राज्य सरकारने दिलेल्या नियमांच पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं.
Preparation of oxygen and ventilator started in the state; Information given by Deputy Chief Minister Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- Coronavirus Cases : २४ तासांत देशात कोरोनाचे २७ हजार ५५३ नवे रुग्ण, १५२५ जणांना ओमिक्रॉनची लागण
- मध्य प्रदेशात बस नाल्यात कोसळून मोठी दुर्घटना, 3 प्रवाशांचा मृत्यू, 7 मुलांसह 28 जखमी
- मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा ; आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मागणी
- तुम्ही शांत रहा, हे राज्य तुमचे नाही, माझं आहे ; डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ज्येष्ठ नागरिकांना खडसावले