Pravin Darekar : भाजपने राज्य सरकारसाठी मागवलेल्या 50 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी अनेक गंभीर आरोप केले. परंतु एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भाजपच्या म्हणण्याला दुजोरा देऊन राष्ट्रवादीची कोंडी केली आहे. या सर्व प्रकारावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य करत केवळ अहंकारापोटी हे कुभांड रचल्याचा आरोप केला आहे. Pravin Darekar criticizes govt after minister Rajendra Shingane’s statment on Remedesivir purchase by bjp
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपने राज्य सरकारसाठी मागवलेल्या 50 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी अनेक गंभीर आरोप केले. परंतु एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भाजपच्या म्हणण्याला दुजोरा देऊन राष्ट्रवादीची कोंडी केली आहे. या सर्व प्रकारावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य करत केवळ अहंकारापोटी हे कुभांड रचल्याचा आरोप केला आहे.
साप-साप म्हणून भुई थोपटणाऱ्यांचं तोंड फुटलं
प्रवीण दरेकर म्हणाले की, आघाडी सरकारचे जे नेते रेमडेसिव्हिरच्या बाबतीत साप-साप म्हणून भुई थोपटत होते. त्यांचं आता तोंड फुटलं आहे. सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की, हा साठा राज्य सरकारकडेच जाणार होता. ब्रुक फार्मा कंपनीत गेल्यापासून कारण एफडीए मंत्री राजेंद्र शिंगणे हे या सगळ्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक होते. त्यांना सुरुवातीपासूनच याची कल्पना होती. मुख्य सचिव, एफडीए यांना आधीच याची कल्पना होती की हा साठा तुमच्याकडे येणार आहे. एवढंच नाही, तर प्रत्यक्षात सातपुडा या निवासस्थानी जाऊनही शिंगणेंच्या मालकांना याची कल्पना दिली. यानंतर शिंगणे यांनीही यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
भाजपनं इंजेक्शन मागवल्याचं कळताच अहंकार जागा झाला
दरेकर पुढे म्हणाले की, परंतु हे भाजपमार्फत होतंय हे कळल्यावर त्यांचा अहंकार जागा झाला. कारण या सरकारला लोकांच्या जीवितापेक्षा, आरोग्य व्यवस्थेपेक्षा स्वत:चा अहंकार महत्त्वाचा आहे. यामुळे सरकारने स्वत: रेमडेसिव्हिरचं टेंडर मागवून ते कमिशनपोटी फायनल झालं नाही.
मंत्र्यांचं कोट्यवधींचं कमिशन बुडालं
राज्य सरकारच्या टेंडरबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, आम्ही मागवलेले इंजेक्शन 950 ने घेतले, तर त्यांना 1650 ने कसे दाखवता येतील? यामुळे कोट्यवधींचं कमिशन बुडालं म्हणून त्यांनी कुभांड रचलं. दुपारी नवाब मलिक बोलतात, संध्याकाळी धमकी येते. आणि रात्री मग एखाद्या अतिरेक्याला उचलावं तसं पोलिसांच्या मार्फत उचललं जातं. जो माणूस मदत करतोय त्यालाच अशी वागणूक सरकारकडून मिळत असल्याने मी आणि फडणवीस मिळून तेथे गेलो.
तुमच्या आरोपांचं आता काय करायचं?
दरेकर पुढे म्हणाले की, आता मंत्र्यांनीच कबुली दिली आहे की, तो साठा राज्य सरकारकडेच येणार होता. तर मग आमचा प्रश्न आहे की, तुमच्या आरोपांचं आता काय करायचं? यामुळे दिलीप वळसे असोत, संजय राऊत, अशोक चव्हाण, नाना पटोले असतील किंवा माहिती न घेता बोलणाऱ्या प्रियांका गांधी असतील या सर्वांनी आता माफी मागितली पाहिजे.
Pravin Darekar criticizes govt after minister Rajendra Shingane’s statment on Remedesivir purchase by bjp
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्री राजेंद्र शिंगणेंनी राष्ट्रवादीचीच केली कोंडी, म्हणाले, ‘भाजपनं मागवलेलं रेमडेसिव्हिर राज्य सरकारलाच मिळणार होतं’
- लवकरच येणार जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस व्हॅक्सिन, कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची परवानगी मागितली
- कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणार DRDOचे नवे संशोधन, हायपॉक्सियात जाण्यापासून रुग्णांचा होईल बचाव
- Corona Updates : देशात सलग तिसर्या दिवशी २.५९ लाखांहून अधिक रुग्ण, २४ तासांत १७६१ जणांचा मृत्यू
- काय सांगता! रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन सर्वांसाठी फुकट; दमण-दीवचे प्रशासक प्रफुल पटेल यांचा ऐतिहासिक निर्णय