Praveen Jadhav family Threatened : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा भाग असलेल्या तिरंदाज प्रवीण जाधव याच्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. त्याच्या आई -वडिलांना गावात त्यांच्या घराचे बांधकाम करायचे आहे, परंतु त्यांचे शेजारी त्यांना तसे करू नका, अशी धमकी देत आहेत. यावर बांधकाम करू दिले नाही तर आम्ही गाव सोडू, असे प्रवीण जाधवच्या आईवडिलांचे म्हणणे आहे. Praveen Jadhav family Threatened, who participated in Tokyo Olympics, father said – will leave the village
वृत्तसंस्था
सातारा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा भाग असलेल्या तिरंदाज प्रवीण जाधव याच्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. त्याच्या आई -वडिलांना गावात त्यांच्या घराचे बांधकाम करायचे आहे, परंतु त्यांचे शेजारी त्यांना तसे करू नका, अशी धमकी देत आहेत. यावर बांधकाम करू दिले नाही तर आम्ही गाव सोडू, असे प्रवीण जाधवच्या आईवडिलांचे म्हणणे आहे.
प्रवीण जाधवचे आई-वडील सातारा जिल्ह्यातील सारडे गावात राहतात. येथे प्रवीणचे दोन खोल्यांचे एक छोटे घर आहे. घराचे त्यांना बांधकाम करायचे होते. प्रवीणच्या आईवडिलांनी आरोप केला आहे की, त्यांचे शेजारी त्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्यात अडथळे आणत आहेत. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. प्रवीणचे वडील रमेश जाधव यांचे म्हणणे आहे की, जर हा वाद मिटला नाही, तर त्यांना आपले गाव सोडून जावे लागेल.
का मिळतेय धमकी?
नुकताच टोकियोहून भारतात परतलेल्या प्रवीण जाधवने एका वृत्तसंस्थेला सांगितले, “माझे आई -वडील शेती महामंडळात (राज्य कृषी महामंडळ) काम करत होते. महामंडळानेच आम्हाला ही जमीन दिली आणि जेव्हा आमची आर्थिक स्थिती सुधारू लागली, तेव्हा आम्ही घर बांधण्यास सुरुवात केली.” प्रवीणने हेदेखील सांगितले की, महामंडळाने त्यांना या जमिनीसाठी भाडेपट्टी दिली नव्हती आणि फक्त तोंडी करार झाला होता.
त्याने सांगितले की, सैन्यात नोकरी मिळाल्यानंतर जेव्हा घराची आर्थिक स्थिती सुधारली, तेव्हा त्याच्या कुटुंबाने प्रथम दोन खोल्यांचे घर बांधले. त्या वेळी कोणीही आक्षेप घेतला नाही, परंतु आता जेव्हा त्यांनी मोठे घर बांधण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि संपूर्ण जमीन त्यांच्या मालकीची असल्याचा दावा केला. प्रवीणने सांगितले की, शेजाऱ्यांच्या आक्षेपानंतर ते जमिनीचा काही भाग सोडण्यास तयारही आहेत.
त्याने सांगितले की, घर बांधण्यासाठी 1.40 लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले होते, पण नंतर त्याला तेच साहित्य 40 हजार रुपयांत विकावे लागले. त्याने आरोप केला की, जेव्हा त्याने घरात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला धमकावले आणि पोलिसांत तक्रार केली होती.
वाद लवकरच सुटण्याची अपेक्षा
एसडीओ शिवाजी जगताप यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ती जमीन अजूनही शेती महामंडळाची आहे. त्यांनी सांगितले की, जाधव कुटुंबाने घर बांधण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांच्या शेजाऱ्यांनी हे म्हणत आक्षेप घेतला की, यामुळे त्यांच्या येण्याजाण्याचा मार्ग बंद होऊन जाईल. त्यांनी सांगितले की, ते स्वत: आणि काही पोलिस तेथे पोहोचले आणि दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. येत्या काही दिवसांत हा वाद मिटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रवीणच्या नावे जमिनीचा काही भाग हस्तांतरित करण्याची शक्यताही प्रशासन शोधत आहे. शेजारची कुटुंबे त्याच्या कुटुंबाला ‘भेट’ म्हणून तीन गुंठे जमीन देण्यासही तयार आहेत. प्रवीणने सांगितले होते की, एके दिवशी त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील 5-6 सदस्यांनी घर बांधण्यासाठी त्याच्या पालकांना धमकी दिली. प्रवीणनेही लष्कराला याबाबत माहिती दिली आहे.
प्रवीणचे हे पहिले ऑलिम्पिक होते. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये प्रवीणला जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची तिरंदाज ब्रॅडी एलिसनकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर तो नुकताच भारतात परतला आहे.
Praveen Jadhav family Threatened, who participated in Tokyo Olympics, father said – will leave the village
महत्तवाच्या बातम्या
- टेरर फंडिंग प्रकरणात छापे; एनआयएने जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणी छापे घातले, फुटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची घरांची झडती
- MADE IN INDIA : मोदी है तो मुमकिन है ! स्वदेशी टॉय फॅक्ट्री 410 कोटींची गुंतवणूक ; 2024 पर्यंत भारतीय खेळणी उद्योग उलाढाल 200 अब्ज ; यासह हजारो रोजगार…
- FIH Ranking : Tokyo Olympic मधील ऐतिहासिक कामगिरीचं फळ ! भारतीय पुरुष हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर तर महिला संघाची आठव्या स्थानावर उडी
- बकरी ईदवर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी, मंदिरांमध्ये बाली तर्पणवर बंदी
- मोदी सरकारच्या TOPS पॉलिसीमुळे चमकू लागलेत भारतीय खेळाडू… काय आहे ही पॉलिसी…??