प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. फुले वाहिली आणि औरंगजेबाच्या राज्यासाठी दोष जयचंदांना दिला!!Prakash Ambedkar visited Aurangzeb’s grave with flowers, blamed Jaichand for Aurangzeb’s rule!!
अलिकडे औरंगाजेबचे स्टेटस ठेवून उदात्तीकरण केल्यानंतर ठिकठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबच्या कबरीला भेट देऊन फुले वाहिली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. औरंगाजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगाजेबचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. जयचंद इथे आले आणि राज्या-राज्यात झाले. त्यामुळे जयचंदांना शिव्या घाला. औरंगाजेबला शिव्या कशाला घालता?,” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.
या भेटीनंतर शिवसेनेची कोंडी होऊ शकते? या प्रश्नावर मोजक्या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. “या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही,” असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.
औरंगाजेबच्या स्टेटसमुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला आहे. याबद्दल विचारल्यावर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर, दोन दिवसांत विषय निपटून टाकला असता. ते वादाचा विषय होऊ देता म्हणून वाद पेटतात, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
Prakash Ambedkar visited Aurangzeb’s grave with flowers, blamed Jaichand for Aurangzeb’s rule!!
महत्वाच्या बातम्या