प्रतिनिधी
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर देशात परिवर्तनाची ही नांदी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मात्र त्यांच्या या दाव्याचा फुगा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फोडून टाकला आहे. Prakash Ambedkar pinched Congress – NCP over kasba victory and chinchwad defeat
कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा विजय हा वैयक्तिक त्यांचा आहे. पक्षाचा नव्हे, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला डिवचले आहे. त्याचबरोबर चिंचवड मध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे पडले ही धारणा चुकीची आहे.
उलट राष्ट्रवादीने नाना काटे यांना उभे करून राहुल कलाटे यांना पाडले, असे तुम्ही का नाही म्हणत??, असा उलटा सवाल प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांना करून राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले आहे. प्रकाश आंबेडकरांनी चिंचवड मध्ये येऊन राहुल कलाटे यांचा प्रचार केला होता. त्यामुळे त्यांनी आजही राहुल कलाटे यांचीच बाजू उचलून धरली. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचून घेतले.
रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. पुण्यातल्या मराठी माध्यमांनी देखील या आनंदाला खतपाणी घातले आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या सकट सर्वच नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आल्याचा दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा दाव्याचा फुगा दोनच वाक्यांमध्ये फोडून टाकला आहे.
Prakash Ambedkar pinched Congress – NCP over kasba victory and chinchwad defeat
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी हिंडेनबर्ग अहवाल फेटाळला : म्हणाले- अदानी समूहावरील अहवाल केवळ आरोप; दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष
- भारतात होणार छोट्या विमानांची निर्मिती : एम्ब्रेयर आणि सुखोईच्या उत्पादनासाठी चर्चा, दुर्गम भागात होणार फायदा
- द फोकस एक्सप्लेनर : भारतात नव्या व्हायरसचा धुमाकूळ, काय आहे H3N2? खोकल्यावर सिरप-औषधेही कुचकामी, वाचा सविस्तर