भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही तुफान गर्दी होती. आपल्या घरातीलच कुणी व्यक्ती गेली आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु समाजमाध्यमांवर काही जणांनी लतादीदींच्या मृत्यूनंतरही ट्रोलिंगचं घाणेरडं काम केलंय. यावर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.Prakash Ambedkar angry over trolls after Latadidi’s death, protests against trolls
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही तुफान गर्दी होती. आपल्या घरातीलच कुणी व्यक्ती गेली आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु समाजमाध्यमांवर काही जणांनी लतादीदींच्या मृत्यूनंतरही ट्रोलिंगचं घाणेरडं काम केलंय. यावर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, “काल समाजमाध्यमांवर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडे काम केलंय. त्यांचा आंबेडकर कुटुंबियांकडून जाहीर निषेध करतो.”
वास्तविक, असे सांगितले जाते की, लतादीदी हयात असताना त्यांनी आंबेडकरी गीते गाण्यास नकार दिला होता. यावरून त्या हयात असतानाही वाद होता. परंतु त्यांच्या निधनानंतरही काही जणांनी समाजमाध्यमांवर घाणेरडी ट्रोलिंग केली. यावरच प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मार्क झुकेरबर्ग संकटात : फेसबुक आणि इंस्टाग्राम लवकरच बंद होणार?, डेटा ट्रान्सफर सुविधेच्या अटीमुळे गोची
- केरळच्या महिलेने जिंकली कोट्यवधी रुपयांची लॉटरी; तब्बल ४४.७५ कोटींचा मिळाला फायदा
- कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा आधारस्तंभ हरपला; सुधीर कलिंगण यांचे आजाराने निधन
- हुंडाईच्या पाकिस्तानी शाखेची मस्ती, स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार!! #Boycott hudai ट्रेंडनंतर हुंडाईच्या भारत शाखेकडून पाकिस्तानी शाखेचा निषेध!!
- भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले; एक हजारावा सामना पडला पदरात