मौनव्रत धारण करत सोशल मिडियावर दिले मोठे संकेत
विशेष प्रतिनिधी
पुणे : अभिनेत्री प्राजक्ता माळी हे मराठी मनोरंजन विश्वातील मोठं नाव . प्राजक्ता माळी आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातून कायमच चर्चेत असते. प्राजक्ता ही श्री श्री रविशंकर यांची शिष्य असून, आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून ती योग्य क्रिया आणि मेडिटेशन करत असते . Prajakta mali Art of Living program.
प्राजक्ता आता देखील श्री श्री रवीशंकर यांच्या त्रिवेणी आश्रमात पोहोचली आहे. तिथून तिने एक पोस्ट शेयर केली आहे. तिथे प्राजक्तानं मौनव्रत धारण केलं आहे.तिथे गेल्यावर तिने तिचे काही फोटो शेयर केले आहेत ज्यात तिने लिहिलं आहे की, “आयुष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींगचं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल”, असं म्हणत प्राजक्तानं आश्रमातील फोटो शेअर केले आहे.
प्राजक्तानं सुरुवातीला आर्ट ऑफ लिविंगचा कोर्स केला होता. आता ती याच कोर्सची अँडवान्स ट्रेनिंग घेण्यासाठी गेली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये सांगतिले आहे की, तिचा फोनही काही दिवस किंवा तास बंद असेल. या पोस्टसोबतच तिने #गुरूतत्व #सानिध्य #ध्यान #योगी #शांती असे काही हॅशटॅगही वापरले आहेत.
प्राजक्ता माळी चा प्राजक्ता राज हा मराठमोळ्या दागिन्यांचा नवा ब्रँड आहे . या ब्रँडच्या माध्यमातून प्राजक्ता एक बिझनेस वुमन बनली असून , तिच्या या दागिन्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळतीय. वेळोवेळी ती तिच्या समाज माध्यमातून या दागिन्यांनं बाबत बोलत असते. प्राजक्ता हास्य जत्रा या कार्यक्रमाचा निवेदन करते . सध्या ती ब्रेकवर असून, मेडिटेशनच्या माध्यमातून सुट्टी एन्जॉय करत आहे . प्राजक्ताने नुकतंच कर्जत इथे फार्म हाऊस खरेदी केलं होतं. प्राजक्ता कुंज असं या तिच्या नवीन घराचे नाव असणार आहे. खानदानीतलं मोठं घर खानदानीतल्या मोठ्या कर्जासह असे म्हणत तिने ही बातमी समाज माध्यमातून दिली होती.
Prajakta mali Art of Living program.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार मोठा झटका; नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह, पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना पाठिंबा!
- पवार अजूनही सुप्रिया सुळेंच्या हातात सूत्रे का देत नाहीत??; त्यांना जानकी रामचंद्रन, शशिकला, एन. टी रामाराव आठवतात का??
- Manipur violence : ‘’… अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल’’ राज ठाकरेंचं विधान