प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्ती नाट्याच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठका घेतल्या. मात्र त्या बैठकांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच गैरहजर होते. कारण त्या बैठकीची कोणती माहितीच जयंत पाटलांना नव्हती. संबंधित बैठकीची आपल्याला माहिती नसल्याचे स्वतः जयंत पाटलांनी पुण्याच्या साखर संकुलात पत्रकारांना सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या चालल्या.Praful Patel’s revelation in the evening that there is nothing “like that”.
दिवसभराच्या या बातम्या नंतर सायंकाळी प्रफुल्ल पटेल यांनी त्यासंदर्भात खुलासा केला. मूळात यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही अधिकृत बैठक नव्हती. शरद पवार मुंबईत असल्यामुळे त्यांनी नियमित कामकाजानुसार बैठका घेतल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते पवारांना भेटण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आले होते. त्यामुळे आपोआपच त्याला बैठकीचे स्वरूप आले. प्रत्यक्षात कोणतीही औपचारिक बैठक बोलावली नव्हती. त्यामुळे जयंत पाटलांना तसा मेसेज द्यायचे कारण नव्हते. त्यांच्या साखर कारखान्या संदर्भात पुण्यात त्यांची बैठक होती. त्यामुळे ते तिकडे गेले होते आज सायंकाळी ते मुंबईत परत येतील, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी दिवसभराच्या बातम्या नंतर केला.
त्याचवेळी त्यांनी अंदाजपंचे बातम्या आम्ही पण टीव्हीवर पाहत होतो, असे सांगितले. पण त्या बातम्यांचा ताबडतोब खुलासा करायला कोणी का पुढे आले नाही??, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला नाही आणि त्यामुळे त्याचे उत्तरही त्यांनी दिले नाही.
यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवारांवर झालेल्या बैठकीत त्यांच्या निवृत्ती संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाकी आम्ही सर्व नेत्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णयाचा फेरविचार केल्याचे आवाहन केले आहे, ते कायम आहे. यापेक्षा दुसरी काहीच चर्चा घडली नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अध्यक्षपदात रस नाही : प्रफुल्ल पटेल
त्याचवेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या रेस मध्ये नसल्याचाही खुलासा करून टाकला. मूळात राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष आहेत. त्यामुळे जे पद रिकामेच नाही, त्या पदाबाबत चर्चा करण्यात काय अर्थ आहे??, असा असावा त्यांनी पत्रकारांना केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस मधला कोणत्याही पदाचा निर्णय सर्वानुमतेच होईल. त्यात कोणतेही मतभेद होणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकजूट टिकून राहील. फूट पडणार नाही, असा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी केला.
Praful Patel’s revelation in the evening that there is nothing “like that”.
महत्वाच्या बातम्या
- खरा राजकीय स्फोट : राष्ट्रवादी पुरस्कृत सगळ्या वज्रमूठ सभा रद्द??; महाविकास आघाडीच्या एकजुटीत पाचर??
- पवारांच्या निवृत्ती नाट्यातही सर्व काही आलबेल नाही; राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकीची जयंत पाटलांना माहितीच नाही!!
- PPF Scheme मध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमचीही लॉटरी लागली समजा, कारण…
- खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत!!