• Download App
    प्रदीप शर्मा : सचिन वाझेचा एकेकाळचा बॉस, ११३ एन्काऊंटर, शिवसेनेच्या उमेदवारीवर हितेंद्र ठाकूरलाही नडला|Pradip Sharma: Sachin Waze's one-time boss, 113 encounters, hit Hitendra Thakur on Shiv Sena's candidature

    प्रदीप शर्मा : सचिन वाझेचा एकेकाळचा बॉस, ११३ एन्काऊंटर, शिवसेनेच्या उमेदवारीवर हितेंद्र ठाकूरलाही नडला

    अँटेलिया संशयित कार आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेला निवृत्त पोलीस प्रदीप शर्मा एकेकाळी सचिन वाझेचा बॉस होता. त्याच्या नावावर तब्बल ११३ एन्काऊंटर असले तरी लखन भैया बनावट एन्काउंटर प्रकरणात २०१०मध्ये त्याला अटक झाली. त्यानंतर तीन वर्षांनी सुटका झाली होती. त्यानंतर थेट हितेंद्र ठाकूर यांनाच आव्हान देऊन नालासोपारा मतदारसंघात प्रदीप शर्माने शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविली. मात्र क्षितीज ठाकूर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.Pradip Sharma: Sachin Waze’s one-time boss, 113 encounters, hit Hitendra Thakur on Shiv Sena’s candidature


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: अँटेलिया संशयित कार आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेला निवृत्त पोलीस प्रदीप शर्मा एकेकाळी सचिन वाझेचा बॉस होता. त्याच्या नावावर तब्बल १२३ एन्काऊंटर असले तरी लखन भैया बनावट एन्काउंटर प्रकरणात २०१०मध्ये त्याला अटक झाली.

    त्यानंतर तीन वर्षांनी सुटका झाली होती. त्यानंतर थेट हितेंद्र ठाकूर यांनाच आव्हान देऊन नालासोपारा मतदारसंघात प्रदीप शर्माने शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविली. मात्र क्षितीज ठाकूर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.



    सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा ही जोडगोळी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत होती. सुरुवातीच्याच काळापासून पोलीस दलात एकत्र असलेल्या या दोघांनी आतापर्यंत अनेक एन्काउंटर केले आहेत. शर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशमधील असले तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे महाराष्ट्रातच गेलं आहे. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील हे धुळ्यात स्थायिक झाले होते.

    त्यामुळे प्रदीप शर्मा यांचं प्राथमिक शिक्षण देखील इथेच झालं ह७ोतं. पुढे त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतले. यानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पोलीस सेवेत दाखल झाले. महाराष्ट्र पोलीस दलात १९८३ ला उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. सुरुवातीला त्यांचं ट्रेनिंग हे नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये झालं होतं.

    यावेळी त्यांच्यासोबत विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, प्रफुल्ल भोसले असे दिग्गज पोलीस अधिकारी होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा यांना पहिलचं पोस्टिंग मुंबईत मिळाले होतं. सुरुवातीच्या काळात त्यांनी धडाकेबाज कामगिरी करत अंडरवर्ल्डमधील अनेक गुडांचा खात्मा केला हो ता. शर्मा याने ९० च्याा दशकात १२३ एन्काउंटर केले. त्यामुळे त्याची ओळख एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी बनली होती.

    नेहमी वादग्रस्त राहिल्याने त्याची खातेनिहाय चौकशी होऊन २००८ मध्ये त्याला निलंबित केले होते. त्यानंतर लखन भैया बनावट एन्काउंटर प्रकरणात २०१०मध्ये त्याला अटक झाली. त्यानंतर तीन वर्षांनी सुटका झाली होती. २०१७ मध्ये त्यांना पुन्हा खात्यात घेण्यात आले. त्यानंतर ठाण्याचे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

    शेवटचे पोस्टिंग ठाण्यातील खंडणी विरोधी विभागात होतं. त्यावेळी ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग होते. 2017 साली त्यांनी खंडणी प्रकरणात दाऊदचा भाऊ इ क्बाल कासकर याला देखील अटक केली होती.
    आपल्या नोकरीचे आठ महिने शिल्लक असताना प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला होता.

    2019 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत नालासोपारा मतदार संघातून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.

    लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात पोलीसांनी सुपारी घेतल्याचे स्पष्ट झाले होते. लखनभैय्या आणि त्याचा मित्र अनिल भेडा या दोघांना पोलिसांनी वाशी येथून नोव्हेंबर २००६ मध्ये ताब्यात घेतले होते. नंतर वसोर्वा येथील नाना-नानी पार्कजवळ पोलिसांनी लखनभैय्या याची बनावट चकमक करून त्याला ठार केले होते.

    उच्च न्यायालयाने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत लखनभैय्याला ठार करण्यासाठी पोलिसांना सुपारी देण्यात आल्याचे उजेडात आले होते. यात चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशीसह २२ जणांना अटक करण्यात आली होती.

    पुढे लखनभैय्याचा मित्र भेडा हा अचानक बेपत्ता झाला आणि त्याचा मृतदेह मनोर येथील जंगलात सापडला होता. सत्र न्यायालयाने प्रदीप शमा वगळता १३ पोलिसांसह अन्य आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

    Pradip Sharma: Sachin Waze’s one-time boss, 113 encounters, hit Hitendra Thakur on Shiv Sena’s candidature

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!