• Download App
    कोरोना लसीकरणातही ठाकरे – पवार सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना दिसला तथाकथित मनूवाद!! | power minister nitin raut sees manoovad in corana vaccination utsav proposed by PM narendra modi

    कोरोना लसीकरणातही ठाकरे – पवार सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना दिसला तथाकथित मनूवाद!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही महाराष्ट्रातले काँग्रेस नेते आणि ठाकरे – पवार सरकारमधले ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना “मनूवाद” दिसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादात ११ ते १४ एप्रिल कोरोना प्रतिबंधक लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.power minister nitin raut sees manoovad in corana vaccination utsav proposed by PM narendra modi

    या आवाहनावर नितीन राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, आधी मेणबत्ती, थाळी आणि आता उत्सव कसले साजरे करता? फुले, आंबेडकर हे मनूवादाविरोधात होते. त्यांचे नाव कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला देणे चुकीचे आहे. गोळवलकर गुरूजी हे भाजपचे आद्य दैवत आहे. फुले – आंबेडकर नाहीत, अशी टीकाही राऊत यांनी भाजपवर केली.



    महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उत्सव साजरा करणार नाही, तर अभियान राबविणार असल्याचे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

    कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोना लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला.

    पण महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्र्यांना मात्र यामध्ये तथाकथित मनूवाद दिसल्याचे त्यांनी केलेल्या टीकेवरून स्पष्ट होत आहे. शिवाय त्यांनी गेल्यावर्षीच्या थाळी वादनाचा आणि दीप प्रज्ज्वलनाचा उल्लेख करून भाजपवर निशाणा साधण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, या दोन्ही उपक्रमांना जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची वस्तुस्थिती आहे.

    power minister nitin raut sees manoovad in corana vaccination utsav proposed by PM narendra modi

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !