वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे.
कोरोनाची स्थिती पाहून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, कोरोनाची स्थिती गंभीर आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाची चर्चा झाली. अशावेळी दहावी बारावी विद्यार्थ्यांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
या दरम्यान लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी जी काही चर्चा झाली ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने जो निर्णय घेतल आहे, तो सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनी घ्यावा असे आवाहन गायकवाड यांनी केले.
postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams.
वाचा…
- मध्यप्रदेशामध्ये लॉकडाऊन लावणार नाही ; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सूतोवाच
- पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर लादणाऱ्या राजस्थान सरकारविरोधात पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन, एक दिवस राज्यातील सर्व पेट्रोलपंप बंद
- ऑक्सिजन पुरवठावाढ, रेमडेसिवीरचा जपून वापर आणि अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिन्या उभारण्यावर भर; कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा
- कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय, निवडणूकांच्या राज्यात का नाही वाढत?; काँग्रेसचे मंत्री अस्लम शेरखान यांचा सवाल
- घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी आरोपीला पुण्यात बेड्या