• Download App
    न्यू इंडियन एक्सप्रेस कृत राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेचे पोस्टमार्टेम : अजितदादा हे अमित शहांना भेटले? प्रफुल्ल पटेलही अजितदादांच्या बाजूने?|Post-mortem of the unrest in the Nationalists by New Indian Express: Did Ajit Dada meet Amit Shah? Praful Patel also in favor of Ajitdad?

    न्यू इंडियन एक्सप्रेस कृत राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेचे पोस्टमार्टेम : अजितदादा हे अमित शहांना भेटले? प्रफुल्ल पटेलही अजितदादांच्या बाजूने?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सुप्रीम कोर्टापासून वज्रमूठ सभेपर्यंत वाट्टेल ते प्रयत्न करा; पण शिंदे – फडणवीस सरकारला काहीही धोका उत्पन्नच होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी प्रचंड अस्वस्थता पसरली आहे, तिचे पोस्टमार्टेम न्यू इंडियन एक्सप्रेसने केले आहे. यात पवार काका – पुतण्यांमधील मूलभूत मतभेद, प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे अजितदादांच्या बाजूने उभे राहणे याविषयी प्रामुख्याने चर्चा आहे. त्याचबरोबर ८ एप्रिलला अजितदादा जे नॉट रिचेबल झाले होते, ते खासगी विमानाने अमित शाह यांना भेटायला दिल्लीला गेले असल्याचा दावाही न्यू इंडियन एक्सप्रेसने बातमीत केला आहे. या खेरीज 35 ते 40 आमदार अजितदादांबरोबर आहेत. अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा “याच मार्गाने” पूर्ण होऊ शकते, असाही या बातमीचा दावा दिसतो आहे.Post-mortem of the unrest in the Nationalists by New Indian Express: Did Ajit Dada meet Amit Shah? Praful Patel also in favor of Ajitdad?

    विलक्षण राजकीय योगायोग

    पण त्या पलिकडे जाऊन ज्यावेळी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपूर मध्ये होते आहे, त्याच दिवशी ही बातमी इंडियन न्यू इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध करणे, त्यावर सामना मधून रोखठोक लिहिणे हा “विलक्षण राजकीय योगायोग” साधला गेला आहे.



    ठाकरेंची जबरदस्त संघर्षाची तयारी

    वास्तविक पाहता शिवसेना फुटली आहे. त्यामुळे ठाकरे – शिंदे असा महाराष्ट्रात उभा संघर्ष पेटला आहे. तरीही जनतेच्या दरबारात जाऊन रस्त्यावर लढून सत्ता आणण्याची उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा मिटलेली दिसत नाही. उलट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याचा मराठी माध्यमांचा दावा आहे.

    राष्ट्रवादीचा जुगाडाचा प्रयत्न

    पण जनतेच्या दरबारात जाऊन आणि रस्त्यावर लढवून सत्ता मिळवण्याची ही महत्त्वाकांक्षा राष्ट्रवादीत नसल्याचे न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीतून स्पष्ट होत आहे. काहीही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस फार काळ सत्तेबाहेर राहू शकत नाही आणि जनतेच्या दरबारात जाऊन पूर्ण बहुमतानिशी सत्तेचा कौलही मिळू शकत नाही, अशा कोंडीत पक्षाचे नेतृत्व वर्षानुवर्षे राहिले आहे. त्यामुळे मग कोणता ना कोणता जुगाड करून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा वाटा मिळवावा लागला आहे आणि नेमक्या याच जुगाडावर न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत भाष्य करण्यात आले आहे.

    शरद पवारांना भाजपशी उघड संबंध नको

    आपण भाजप बरोबर जाऊन आपली राजकीय कारकीर्द कलंकित करू इच्छित नाही, असे शरद पवारांनी अजितदादांना स्पष्ट सांगितले आहे. शिवाय अजितदादा नव्हे, तर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्री असतील ही शरद पवारांच्या मनातली खरी सुप्त इच्छा आहे आणि ती मात्र पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे अजितदादा – सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा संघर्ष कायम राहिला, तर राष्ट्रवादी पासून मुख्यमंत्री पद कायमचे दूर राहते. त्यामुळे अजितदादांनी वेगळा आणि स्वतंत्र मार्ग पत्करण्याची वेळ आल्याचे न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीचे विश्लेषण आहे.

    अजितदादा – अमित शाह भेट?

    पण त्या पलिकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा, जो मराठी माध्यमांनी वेगळ्या पद्धतीने उचलला आहे, तो मराठी माध्यमांच्या “पवार अनुकूल नॅरेटिव्हचा” एक भाग आहे, तो म्हणजे भाई जाऊन दादा येणार, हा नॅरेटिव्ह आहे. एकनाथ शिंदे यांना बाजूला करून अजितदादांना भाजप मुख्यमंत्रीपद देईल आणि तेच डील फायनल करण्यासाठी अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते, असा दावा करण्यात येत आहे.

    अमित शाह यांचा दोन दिवसांचा मुंबई दौरा संपला आहे. ते गोव्याला निघूनही गेले आहेत. पण अजितदादा आणि अमित शाह यांची भेट मुंबईतली नसून ती 8 एप्रिलची दिल्लीतली भेट असल्याचे सांगितले जात आहे.

    प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची साथ सोडली?

    शिवाय प्रफुल्ल पटेल अजितदादांच्या बरोबर आहेत. याचा अर्थ प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे लेफ्टनंट म्हणून म्हणजेच क्रमांक दोनचे नेते म्हणून स्थान सोडून दिल्याचे ते निदर्शक मानले जात आहे. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिरचीची थेट संबंध होते. नरिमन पॉईंट मधील सीजे हाऊसचे वरचे 4 मजले ईडीने जप्त केले आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल तसेही ईडीच्या स्कॅनर खाली आहेतच. प्रफुल्ल पटेल यांना त्या झेंगटातून सुटायचे आहे.

    सत्तेखेरीज राष्ट्रवादीची खैर नाही

    त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी खरी नस दाबली गेली आहे ती म्हणजे सत्तेतला वाटा गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय भांडवलीकरण थांबले आहे आणि ठिकठिकाणी आमदार त्यामुळे प्रचंड अस्वस्थ आहेत. रस्त्यावर संघर्ष करून पूर्ण बहुमतानिशी सत्ता मिळवणे हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा घास नाही. त्यांची ताकद मर्यादित संस्थात्मक स्वरूपातच आहे आणि त्या संस्था टिकवण्यासाठी सत्तेच्या ऑक्सिजनची फार मोठी गरज राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. मग ती सत्ता कोणाची का असेना, त्याने पर्सेप्शन लेव्हलवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला फरक पडत असेल, पण “व्यावहारिक” पातळीवर त्याचा फरक पडत नाही. म्हणूनच पवार नेहमी सत्तेच्या वळचणीला जाऊन बसतात असाच आतापर्यंतचा राजकीय अनुभव आहे. अजितदादांचे भाजपशी डील पवारांच्याच कन्सेंटने चालले आहे अशीही चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे.

    नजीकच्याच काय पण दीर्घ भविष्यकाळात देखील केंद्रात स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान असोत किंवा नसोत जे काही राजकीय डील करायचे आहे, त्यात “भाजप” हा घटक वगळून पवारांना कधीही सत्तेचा वाटा मिळणार नाही अशी स्थिती आज आली आहे. मग तो त्यांच्या इच्छेने असो अथवा इच्छेविरुद्ध असो त्याने भाजपला काही फरक पडणार नाही. इतक्या राजकीय अपरिहार्य स्थितीत आल्यानंतर अजितदादा भाजपशी डील करायला पुढे सरसावले असल्याचे बातम्यांचे स्वरूप दिसत आहे.

    2019 ची मोदींची मूळ योजना

    2019 मध्ये काँग्रेस पक्ष बघून बाकी सर्व पक्ष एकत्र आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मूळ योजना होती. पण ती फिस्कटली. पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून राष्ट्रवादीला सत्तेचा सर्वात मोठा वाटा आणि निधीचा सर्वात मोठा वाटा मिळवून घेतला.

    पण नंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 40 आमदार फोडून अख्खी शिवसेनाच नव्याने अस्तित्वात आणली. तोच प्रयोग राष्ट्रवादी बाबत करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.

    भाजपची क्षमता; राष्ट्रवादीची शरणागती

    महाराष्ट्राच्या या सर्व राजकारणात भाजपची अफाट क्षमता आणि राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर त्यांना आलेली प्रचंड अस्वस्थता संघर्ष करण्याऐवजी जुगाड करून सत्ता मिळवण्याची त्यांची धडपड हे तीनच मुद्दे न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमधून अधोरेखित होत आहेत. पण खरंच तसे घडले, तर शरद पवारांची पंतप्रधान पदाची मूळ राजकीय महत्त्वाकांक्षा जशी संपुष्टात आली, तशीच आपल्या कन्येला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविण्याची महत्त्वाकांक्षा अशीच दुरावणार का?, ही शंका ही त्या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

    Post-mortem of the unrest in the Nationalists by New Indian Express: Did Ajit Dada meet Amit Shah? Praful Patel also in favor of Ajitdad?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून