• Download App
    Pornographic conversation in Kalyan; official of the Ministry has been beaten by victim's

    मंत्रालयातील अधिकाऱ्याला पीडित महिलांचा चोप, अश्लील संभाषण प्रकरण; कल्याणमधील घटना

    प्रतिनिधी

    मुंबई : सामाजिक संस्था नोंदणी करून देण्याचा बहाण्याने महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करून महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील एका अधिकाऱ्याल पीडित महिलांनी चोप दिला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Pornographic conversation in Kalyan; official of the Ministry has been beaten by victim’s

    शिवाजी आव्हाड, असे अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली.मात्र पोलिसांन एनसी दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही ? असा सवाल पीडित महिलेने केला आहे. मात्र महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. आणखी काही तक्रार असेल तर तिला आज बोलावलं आहे.त्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

    पीडित महिला बदलापूर परिसरात राहते व एका सामाजिक संस्थेत काम करते. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अधिकारी शिवाजी आव्हाडने सोशल मीडियावर तिच्याशी मैत्री केली.स्वतःची सामाजिक संस्था नोंदणी करून देतो, असे सांगत तिच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला. या पीडित महिलेच्या मैत्रिणीला देखील नगरसेविका बनवतो, असे सांगत तिच्याशी फोनवर अश्लील संभाषण केले. त्यानंतर आव्हाडने या महिलांना फोन करून कल्याणमधील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.

    संतापलेल्या या पीडित महिलांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये गाठून चोप दिला. या मारहाणीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. महिलांनी आव्हाड याला महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधिन केले. मात्र पोलिसांनी आव्हाड विरोधात एनसी दाखल करत प्रतिबंधात्मक कारवाई केली .पोलिसांच्या कारवाईबाबत पीडित महिलेने पोलिसांनी जिथे राहता त्या ठिकाणी जाऊन तक्रार दाखल करा, असा सल्ला दिला.

    पोलिसानी गुन्हा का दाखल केला नाही ? असा सवाल करत पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे .तर महात्मा फुले पोलिसांनी मात्र महिलेच्या तक्रारीनुसार कारवाई केली ,तिला फोन करून तक्रार केली का याबाबत विचारल होते ,पीडित महिलेला आज बोलावलं आहे. तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असं सांगितले. मात्र कॅमरा समोर बोलण्यात नकार दिला आहे.

    •  मंत्रालयातील अधिकाऱ्याला महिलांकडून चोप
    •  संस्था नोंदणीसाठी सोशल मीडियावर केली मैत्री
    •  महिलेच्या मैत्रिणीला नगरसेविका बनवण्याचे आमिष
    •  तिच्याशी फोनवर अश्लील संभाषण केले
    •  कल्याणच्या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले
    •  महिलांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये गाठून चोप दिला
    •  पोलिसांकडून एनसी, प्रतिबंधात्मक कारवाई
    •  गुन्हा दाखल करण्याचा महिलांचा आग्रह

    Pornographic conversation in Kalyan; official of the Ministry has been beaten by victim’s

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मारामारीबद्दल खेद व्यक्त करतानाही जितेंद्र आव्हाडांची नसती मखलाशी, जयंत पाटलांची मध्यस्थी; पण मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्यावर वरकडी!!

    रोहित पवारांची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी; 353 चा गुन्हा दाखल करायची मागणी

    पोलिसांच्या गाडीखाली आडवा, सरकारी कामात अडथळा म्हणून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिसांमध्ये दाखल गुन्हा!!