विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आणि अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अभिनेत्री आलिया फर्निचरवाला उर्फ अलाया एफ यांचे अफेअर चालू असल्याची चर्चा आहे. मात्र, अलायाने त्याचा इन्कार केला असून आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे.Pooja Bedi’s daughter says there is no affair with Balasaheb Thackeray’s grandson, we are just good friends
अलाया चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्यसोबत डेटिंग करत असल्याचं बोललं जातं. दोघांमधील अफेअरच्या चर्चेविषयी अलाया म्हणाली, आम्ही तर केवळ चांगले मित्र आहोत. तुमच्याविषयी चर्चा होणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र अशा अफवा गांभीयार्ने घेण्याची गरज नसते. ऐश्वर्य हा माझा उत्तम मित्र आहे.
तो अत्यंत प्रतिभावान मुलगा आहे. माझ्या आणि ऐश्वर्यच्या डेटिंगच्या चर्चांमुळे जवळच्या लोकांमध्ये उत्सुकता वाढली होती, मात्र आता तेही अशा चर्चांना सरावले आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो, तेव्हा मी माझ्या व्यावसायिक आयुष्याइतका त्याचा विचार करत नाही.
वैयक्तिक जीवन हे नैसर्गिकपणे आकाराला येत जातं. तुम्ही दररोज स्वत:मध्ये प्रगती करण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं. लॉकडाऊनच्या काळात मी हेच केलं. मी फक्त स्वत:बद्दल विचार करत होते, इतर कोणाबद्दल नाही.
अलाया आणि ऐश्वर्य हे अनेकदा एकत्र दिसले आहेत. स्मिता ठाकरे यांनी दुबईला ऐश्वर्यची बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पाटीर्ला अलायाने हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अलायाने मात्र नेहमीच ऐश्वर्य हा आपला जवळचा फॅमिली फ्रेण्ड असल्याचं म्हटलं आहे.
अलाया म्हणाली, आम्ही फक्त चांगले फॅमिली फ्रेण्ड्स आहोत. आमच्या आई एकमेकींना ओळखतात. माझे आजोबा कबीर बेदी ऐश्वर्यच्या आई स्मिता ठाकरे यांना ओळखतात. आमची कुटुंब खूप वर्षांपासून एकमेकांना चांगली ओळखतात. ऐश्वर्य मला खूप गमतीशीर वाटतो. खरं तर आमचे फोटो मीडियामध्ये आता एकत्र दिसायला लागले.
त्यामुळे सगळ्यांना वाटतं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे. पण आम्ही अभिनय, डान्स असे अनेक क्लासेस फार पूर्वीपासून एकत्र करत आलो आहोत. पापाराझींनी तेव्हापासून आमचे फोटो काढले असते, तर त्यांच्याकडे मोठं कलेक्शन झाले असते.
Pooja Bedi’s daughter says there is no affair with Balasaheb Thackeray’s grandson, we are just good friends
महत्त्वाच्या बातम्या
- Changes From 1st July : 1 जुलैपासून बँकिंग, करासह होत आहेत हे 9 बदल, तुमच्या खिशावर असा होणार परिणाम
- महाराष्ट्रातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश
- धर्मांतर झालेल्या दोनपैकी एका तरुणीची घरवापसी, जम्मू-काश्मिरात ‘अँटी लव्ह जिहाद’ कायद्याची शीख नेत्यांची मागणी
- सीए परीक्षा : जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी RTPCRचा निर्णय मागे, सुप्रीम कोर्टाचे Opt-Out Scheme चे आदेश
- खेल रत्न पुरस्कारासाठी मिथाली राज, आर. अश्विनच्या नावाची शिफारस, अर्जुन पुरस्कारासाठी 3 खेळाडू नामांकित