• Download App
    चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानपरिषदेत राजकीय पुनर्वसन; चित्रा वाघ यांना "लगेच" उमेदवारी नाहीPolitical Rehabilitation of Chandrasekhar Bavankule in the Legislative Council

    चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानपरिषदेत राजकीय पुनर्वसन; चित्रा वाघ यांना “लगेच” उमेदवारी नाही

    प्रतिनिधी

    मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत भाजपने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.Political Rehabilitation of Chandrasekhar Bavankule in the Legislative Council

    संघटनात्मक पातळीवर त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहेच. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने एक वेगळ्या प्रकारचा झटका भाजपला आणि त्यांनाही बसला होता. त्यावेळी त्या विषयावर मोठी राजकीय चर्चा झाली होती. परंतु, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचे काम थांबवलेले नव्हते त्यांच्याकडे पक्षाने विदर्भाची विधानसभेचे निवडणुकीची जबाबदारी दिली होती की त्यांनी पार पाडली.

    आता चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपने या निमित्ताने ते राजकीय संदेश देखील दिला आहे. एखाद्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली तर काम थांबवायचे कारण नाही. पुढच्या निवडणूकीत घटनात्मक पातळीवरील संबंधित नेत्याला सामावून घेता येऊ शकते हा तो संदेश आहे.

    मात्र, त्याचवेळी चित्रा वाघ यांना भाजपमध्ये आल्यानंतर ताबडतोब विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांचे यांना भाजपने आपल्या एका प्रवक्त्याच्या रूपाने महाराष्ट्रात पुढे केले असले तरी त्यांना लगेचच उमेदवारीच्या रुपाने बक्षिसी देण्यात आलेली नाही.

    अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल आणि धनंजय सिंह राजहंस हे भाजपचे बाकीचे विधानपरिषदेचे उमेदवार आहेत.

    विधान परिषदेचे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

    Political Rehabilitation of Chandrasekhar Bavankule in the Legislative Council

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!