नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सर्वसामान्य जनतेला कोरोना वेठीला धरतोच आहे, पण त्याचबरोबर उत्तम वैद्यकीय वयवस्था बाळगू शकणार्या आणि उपचार करून घेऊ शकणाऱ्या राजकीय नेत्यांना देखील हुकम हुकम कोरोना होताना दिसत आहे. Political Corona : governor bhagat Singh koshiyari now free from Corona, ajit Pawar tests Corona positive
विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे 20 जून रोजी बंड सुरू होताच दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना कोरोनाचे निदान झाले. त्यांना रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. काल रविवारी 26 जून रोजी ते कोरोना मुक्त होऊन राजभवनात परतले.
आज 27 जून रोजी सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर निर्णय आला तो एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने आला आणि कालच कोरोना टेस्ट करून घेतलेल्या अजित पवारांची आज दुपारी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली!! हा विलक्षण योगायोग ठरला आहे!!
कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे अजित पवारांना आता घरातच क्वारंटाईन व्हावे लागले आहे. घरातच बसून त्यांनी स्वतः ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव असलो तरी तब्येत बरी असल्याचे स्पष्ट केले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय पेचप्रसंगात महत्त्वाच्या राजकीय पात्रांना अशा पद्धतीने कोरोना घेरत असेल तर प्रत्यक्षात विधानसभा सदनात फ्लोअर टेस्ट करण्याआधी कोरोना टेस्ट करून घेऊनच सरकार टिकवा अथवा सरकार घालवा, अशी अनेक नेटिझन्सनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे.
Political Corona : governor bhagat Singh koshiyari now free from Corona, ajit Pawar tests Corona positive
महत्वाच्या बातम्या
- राजस्थान सरकारची वाटचाल महाराष्ट्रासारख्या संकटाकडे? सचिन पायलट पुन्हा गेहलोत गटाच्या निशाण्यावर
- Maharashtra Crisis : ‘मविआ सरकार आणखी 2 ते 3 दिवसच टिकणार’, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मोठा दावा
- Maharashtra Politics : शिंदे यांच्याकडे संख्याबळ होते तर पळून का गेले? राष्ट्रपती राजवट लागणार नाही, शरद पवारांचं मोठं विधान