• Download App
    पोलीसपुत्राची यूपीएसएसीत भरारी, यवतमाळच्या श्रीकांत मोडकला ४६६ वी रँक|Policeman's son Bharari in UPSA, Yavatmal's Shrikant Modak ranked 466th

    WATCH : पोलीसपुत्राची यूपीएसएसीत भरारी, यवतमाळच्या श्रीकांत मोडकला ४६६ वी रँक

    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ : वडील पोलीस खात्यात कॉन्स्टेबल असल्याने लहानपणापासूनच मनावरती आपणही पोलीस खात्यात जाऊन सेवा करावी असे स्वप्न उराशी बाळगले होते. लहानपणी बाळगलेले स्वप्न आज त्याचे साकार होताना दिसत आहे. वडील एएसआय म्हणून नुकतेच निवृत्त झाले.Policeman’s son Bharari in UPSA, Yavatmal’s Shrikant Modak ranked 466th

    तर मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा गड सर केला. त्याला आयपीएस रैंक मिळेल याची शंभर टक्के खात्री आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केले. श्रीकांत रामराव मोडक असे या युवकाचे नाव असून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४६६ रँक मिळवली आहे.



    श्रीकांत मोडक याचे दहावीपर्यंत शिक्षण पुसद येथील कोषटवार महाविद्यालयातून झाले. तर बारावी ही लातूर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातून केले. त्यानंतर इंजिनिअरिंग पुणे येथील सिंहगड महाविद्यालयातून तर एमटेक गुजरातमधील गांधीनगर येतून त्याने केले. लहानपणापासूनच हुशार असल्याने स्कॉलरशिपवरतीच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.

    कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता केवळ सेल्फ स्टरी स्टडीज आणि लायब्ररीमध्ये अभ्यास करून यश मिळवले आहे.श्रीकांत याने खासगी कंपनीत नोकरीवर असताना परीक्षा दिली. त्यात यश आले नाही. आणि त्याने नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे यूपीएससीचा अभ्यास करण्याचे ठरविले. यवतमाळ येथे एकवर्षं तयारी केली.

    त्यानंतर थेट दिल्ली गाठून तयारीला लागला. आतापर्यंत चार वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यात एक वेळ 3 गुणांनी मुलाखतीपासून वंचित राहिला. मात्र त्याने जिद्द सोडली नाही आणि पाचव्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि मुलाखती पर्यंत पोहचला. नुकत्याच लागलेल्या निकलमध्ये त्याला 466 रँक मिळाली. त्यामुळे आपल्याला आयपीएस हे कॅडर मिळेल असा त्याला ठाम विश्वास आहे.

    यवतमाळच्या श्रीकांत मोडकला यूपीएससीत ४६६ वी रँक

    • यवतमाळच्या श्रीकांत मोडकचे यूपीएसएसीत यश
    • श्रीकांत मोडकचे वडील पोलीस खात्यातून निवृत्त
    • आयपीएस केडर मिळण्याची श्रीकांतला खात्री
    • यूपीएससीमध्ये श्रीकांतला ४६६ वी रँक
    • श्रीकांतने पाचव्या प्रयत्नात सर केला यूपीएससीचा गड
    • सेल्फ स्टडीज आणि ग्रंथालयात अभ्यासून श्रीकांतने मिळवले यश
    • एकदा 3 गुणांमुळे मुलाखतीपासून राहिला होता वंचित
    • तरीही जिद्द न सोडता श्रीकांतने सुरू ठेवली तयारी
    • श्रीकांत मोडकच्या यशामुळे होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा

    Policeman’s son Bharari in UPSA, Yavatmal’s Shrikant Modak ranked 466th

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!