शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मोठ्या प्रमाणात माया गोळा केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना चौकशीत दोन कोटी रुपयांची रक्कम आणि सोन्याने भरलेला डबा सापडला आहे. Police seized Rs 2 crore cash and a gold ornaments from State Education Council Commissioner Tukaram Supe
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मोठ्या प्रमाणात माया गोळा केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना चौकशीत दोन कोटी रुपयांची रक्कम आणि सोन्याने भरलेला डबा सापडला आहे.
सुपे यांच्या चौकशीत लपवून ठेवलेली आणखी 1 कोटी 59 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. त्याबरोबरच त्याच्याकडून 44 वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने असलेला डबा शोधून काढत मोठे घबाड जप्त केले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 2 कोटी 47 लाख 81 हजारांची रोकड आणि दागिने जप्त केले आहे.
2019-2020 मधील टीईटी परिक्षेत परिक्षार्थींकडून पैसे घेऊन परिक्षेच्या निकालात फेरफार करून त्यांना पात्र केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याचा सहभाग आढळल्याने त्याला 16 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याच्याकडील चौकशीत त्याने परीक्षेच्या माध्यमातून त्याने गैर लाभाने कमवलेली 88 लाख 49 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती. तसेच 5 ग्रॅम सोन्याचे नाणे, 5 तोळ्याचे 5 लाख 50 हजारांचे दागिने जप्त केले होते. तसेच एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली होती.
सुपेकडील चौकशी दरम्यान सुपेने दोन पैशांच्या बॅगांपैकी त्याच्या मुलीकडे एक बॅग ठेवल्याचे, तसेच त्याच्या जावयाने त्याच्या मित्राकडे दुसरी बॅग ठेवल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. पैशाबाबत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर तपास अधिकारी निरीक्षक कुमार घाडगे व तपास पथकातील अमंलदारांनी तुकाराम सुपे, जावई व मुली यांना रहयला असलेल्या चर्होली येथे जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना 97 हजार रूपये सापडले.
Police seized Rs 2 crore cash and a gold ornaments from State Education Council Commissioner Tukaram Supe
महत्त्वाच्या बातम्या
फिलिपाइन्समध्ये RAI चक्रीवादळाचा कहर, भीषण वादळामुळे 208 जणांचा मृत्यू, मोठ्या प्रमाणावर नुकसान
- TET Exam scam : तुकाराम सुपेंच्या पत्नी व मेहुण्याने लपवून ठेवलेलं 2.40 कोटींचं घबाड पोलिसांनी शोधलं…
- कोलकाता महापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली फेरनिवडणुकीची मागणी, आज भाजपचा निषेध मोर्चा
- कोकणातील आंबा नवी मुंबईत आला हो; खवय्यांसाठी खुशखबर; २५ डझन आवक
- सोलापूरच्या मशिदीत प्रथमच लसीकरण शिबिर, नागरिकांचा भरभरून प्रतिसाद;४०० जणांना डोस
- परीक्षा घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला – उदय सामंत