• Download App
    संतोष परब यांच्यावर हल्ला करणारे चार हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात ; हल्ल्याची दिली कबुली|Police arrest four assailants who attacked Santosh Parab; He confessed to the attack

    संतोष परब यांच्यावर हल्ला करणारे चार हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात ; हल्ल्याची दिली कबुली

    हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार क्र.MH 14 – BX – 8326 ही कार फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली.हल्लेखोरांनी हल्ल्याची कबूली दिली आहे.Police arrest four assailants who attacked Santosh Parab; He confessed to the attack


    विशेष प्रतिनिधी

    कणकवली : जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर हल्ला करणारे चौघा हल्लेखोरांना कारसह पोलिसांनी पकडले आहे.हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार क्र.MH 14 – BX – 8326 ही कार फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली.हल्लेखोरांनी हल्ल्याची कबूली दिली आहे.

    जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, ऍडिशनल एसपी नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची कसून चौकशी केल्याचे समजते.दरम्यान चारही आरोपींना आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता चौघांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.



    दरम्यान चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही. परंतु परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता.

    Police arrest four assailants who attacked Santosh Parab; He confessed to the attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस