• Download App
    PMNRF : पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे आगीतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत। PMNRF : Two lakh assistance to the relatives of the deceased from the Prime Minister’s Offic

    PMNRF : पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे आगीतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

    पुणे जिल्ह्यातील मुळशीमधल्या उरवडे मधे पिरंगुट औद्योगिक परिसरातील अक्का टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती.


    या कंपनीत तेव्हा 37 कामगार होते. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला .


    विशेष प्रतिनिधी

    पुणेः पुण्याच्या मुळशीतील उरवडे येथील पिरंगुट औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली. उरवडेतील क्लोरिफाईड कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 18 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयानंही मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे .
    PMNRF : Two lakh assistance to the relatives of the deceased from the Prime Minister’s Offic

    PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख

    महाराष्ट्रातील पुणे येथील औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे .तर जखमींना 50,000 रुपये देणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केलं. ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41 कामगार कामावर आले होते.



    काय घडली घटना?

    पुणे जिल्ह्यातील मुळशीमधल्या उरवडे मधे पिरंगुट औद्योगिक परिसरातील अक्का टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या कंपनीत तेव्हा 37 कामगार होते. त्यातले 17 जण अडकले होते.आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या घटनेत आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

    PMNRF : Two lakh assistance to the relatives of the deceased from the Prime Minister’s Offic

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jitendra Awhad : आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? विधिमंडळातील घटनेवर आव्हाडांचा संताप, तर पडळकरांकडून दिलगिरी

    Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप- फक्त 4 सेकंदात भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर कोट्यवधीची जमीन, जावेद शेखला आयकरची नोटीस

    Mahayuti Govt : महायुती सरकारची मोठी घोषणा- पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे