• Download App
    मोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय... पण...!; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादनPM Modi wants to end Dynasty politics, but he will not be able to finish me, says Pankaja munde

    मोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…!; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी 

    अंबेजोगाई : काँग्रेस मध्ये घराणेशाहीचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घराणेशाहीचे राजकारण संपवायचे आहे. पण याचा अर्थ असा नाही की… मी घराणेशाहीचे प्रतीक आहे म्हणून मला मोदी संपवतील, मी तुमच्या मनात असेन तर तेही मला संपवू शकणार नाहीत, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने आयोजित केलेल्या सेवा पंधरवड्यात केले आहे. PM Modi wants to end Dynasty politics, but he will not be able to finish me, says Pankaja munde

    आंबेजोगाईत बुद्धिजीवीशी संवाद या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे या व्यासपीठावर होत्या.

    पंकजा मुंडे म्हणाल्या की, काँग्रेस मध्ये घराणेशाहीचे राजकारण सुरू आहे आणि तेच राजकारण नरेंद्र मोदी यांना संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, मी सुद्धा घराणेशाहीचे प्रतीक आहे, म्हणून ते मला संपवतील. मात्र, मी तुमच्या मनात असेन तर मला कोणी संपवू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

    राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे. गणेश मंडळ करा, नवरात्री करा, दांडिया करा, गरबा करा, हे माझे काम नाही. असे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षित नाही. माझे काम संस्कृती जपणे आहे. पण माझे काम देशाला काहीतरी देणे आहे. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

    PM Modi wants to end Dynasty politics, but he will not be able to finish me, says Pankaja munde

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस