• Download App
    PM Kisan : नवीन वर्षात पंतप्रधान मोदी देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 20 हजार कोटी रुपये । PM Kisan PM Modi will give a gift to the farmers on the new year, will transfer Rs 20,000 crore to the account of 10 crore farmers

    PM Kisan : नवीन वर्षात पंतप्रधान मोदी देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २० हजार कोटी रुपये

    PM Kisan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ते शेतकऱ्यांना योजनेच्या दहाव्या हप्त्याची रक्कम जारी करतील. 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान 10 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हस्तांतरित करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १.६ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. PM Kisan PM Modi will give a gift to the farmers on the new year, will transfer Rs 20,000 crore to the account of 10 crore farmers


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ते शेतकऱ्यांना योजनेच्या दहाव्या हप्त्याची रक्कम जारी करतील. 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान 10 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हस्तांतरित करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १.६ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

    पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले आहे की, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करतील.

    कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 351 FPO ला 14 कोटी रुपयांचे इक्विटी अनुदानही जारी करतील. याचा फायदा १.२४ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. एफपीओशी संवाद साधण्यासोबतच पंतप्रधान देशाला संबोधितही करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांसह कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमरही उपस्थित राहणार आहेत.

    या योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये देते. म्हणजेच, तुम्हाला 4 महिन्यांच्या फरकाने 2000 रुपये मिळतात. हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. या योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत १.६ लाख कोटी रुपयांचे मानधन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले आहेत.

    PM Kisan PM Modi will give a gift to the farmers on the new year, will transfer Rs 20,000 crore to the account of 10 crore farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!