ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.रस्त्याच्या कडेला त्यांनी गाडी पार्क केली होती.दरम्यान पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. Pimpri: MNS women vice president Anita Panchal’s car vandalized; It happened while Raj Thackeray was on a tour of Pune
विशेष प्रतिनिधी
पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असताना पिंपरीतील मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.तिघा जणांनी पांचाळ यांची गाडी फोडल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.ही घटना गुरुवार,१६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास घडली.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.रस्त्याच्या कडेला त्यांनी गाडी पार्क केली होती.दरम्यान पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. यात, त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात अनिता पांचाळ राहतात. त्या आगामी महापालिका निवडणूक लढवण्यास अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. अनिता पांचाळ यांनी आरोप केला आहे की,पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. याच रागातून आपल्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.
Pimpri : MNS women vice president Anita Panchal’s car vandalized; It happened while Raj Thackeray was on a tour of Pune
महत्त्वाच्या बातम्या
- थंडीमुळे गंभीर आजार, मृत्यूचाही धोका; कोरोनाबाबत राष्ट्राध्यक्ष बिडेन यांचा इशारा
- उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता; हवामान खात्याचा पाच दिवसांसाठी अंदाज
- ‘गोड’ NEWS ! पेट्रोल पुन्हा स्वस्त -साखर कारखान्यांना आर्थिक आधार ; मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…
- गोव्यात भाजपला आणखी एक धक्का ; आमदार एलिना सालडाणा यांनी तडकाफडकी दिला आमदारकीचा राजीनामा