विशेष प्रतिनिधी
पिंपरी : पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी दुकानाची वेळ वाढवून देण्यासाठी नुकतेच घंटानाद आंदोलन केले. आता पिंपरी चिंचवडमधील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (ता.5 ) महापालिकेवर मोर्चा काढला आहे.Pimpri Chinchwad Trades Urged the government to give permission to open shops till 7 pm. Traders given request Letter to municipal commissioner
शहरातील दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी पिंपरी चिंचवड पालिकेवर देखील मोर्चा काढला. त्यानंतर मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिले.
- पिंपरी चिंचवड पालिकेवर व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा
- दुकानाची वेळ वाढवून देण्याचा धरला आग्रह
- मुंबईचे नियम पिंपरी- चिंचवडला लागू करावेत
- पुण्यातील व्यापाऱ्यांनी नुकताच केला घंटानाद
- मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिले
- परवानगी दिली नाही तर दुकाने उघडीच ठेवणार
- कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी