विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड भागामध्ये मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. कधी रात्री नंग्या तलवारी काढत, रात्री अपरात्री स्थानी सोसायट्यांमधून आरडाओरड करत फिरणे, रस्त्यावरून जाणाऱ्या स्थानिकांना लुटणे, शिवीगाळ करणे, गोळीबार करणे अशा अनेक घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
Pimpri-Chinchwad Crime: In Pimpri Chinchwad, a gang of 5 beat up a garage owner and robbed him
तर नुकताच पिंपरी येथील एका पाच जणांच्या टोळीने एका गॅरेजवाल्यांना लुटल्याच्या प्रकार झाला आहे. 1 लाख 40 हजार 300 रुपयांचा माल ह्या टोळीने लुटून नेला आहे.
फिर्यादी फैयाज राशद शहा (वय वर्ष 29, रा. दत्तनगर, चिंचवड) यांचे आंबेडकर चौक पिंपरी येथे गॅरेज आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी ते पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर चौकातून नेहरू नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी रिक्षात बसलेल्या पाच जणांच्या टोळीने त्यांना अडवले, शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारले, बांबूने मारहाण केली.
त्यापैकी एकाने तर ब्लेडने वार केले. ते पाच जण आणि फिर्यादी एकटे असल्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. या पाच जणांनी मिळून त्यांच्याकडे असणारी रोख रक्कम, पाकीट, मोबाईल, जॅकेट असा एकूण 1 लाख 40 हजार 300 रुपयांचा माल लुटून नेलेला आहे. आणि ते रिक्षा घेऊन पळून देखील गेले.
या प्रकरणी पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत. या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण अश्या प्रकारच्या वाढत्या प्रकरणाचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
Pimpri-Chinchwad Crime: In Pimpri Chinchwad, a gang of 5 beat up a garage owner and robbed him
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??