विशेष प्रतिनिधी
धुळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे चित्र बॉल पेनच्या माध्यमातून तयार करून जागतिक विक्रम करणार आहे, असे धुळे येथील ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र सोनार यांनी सांगितले.
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित (ता. १९ ) राजेंद्र सोनार यांनी हा निर्धार व्यक्त केला.Picture of coronation ceremony of Shivaraya will be drawn with a ball pen
नामांकित छायाचित्रकार , ज्येष्ठ पत्रकार तथा उत्कृष्ट व्यंगचित्रकार, अशी राजेंद्र सोनार यांची ओळख असून त्यांनी ४५ वर्षांमध्ये धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट अशी छायाचित्रे टिपून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे चित्र बॉल पेनच्या माध्यमातून साकारून जागतिक विक्रम करणार आहेत.
- शिवरायांच्या राज्याभिषेकाचे चित्र साकारणार
- केवळ बॉल पेनच्या सहाय्याने काढणार आहेत
- राज्याभिषेकाचे चित्र तयार करण्यास सुरुवातही
- जागतिक विक्रम नावावर करण्याचे ठरविले
- धुळ्यातील छायाचित्रकार राजेंद्र सोनार यांचा निर्धार