• Download App
    जोतिबा दर्शनासाठी आलेले भाविक इ पास सेवेमुळे वैतागले! दर्शनासाठी भर उन्हात भल्या मोठ्या रांगा | People who went for jotiba darshan got annoyed due to e-pass service!

    जोतिबा दर्शनासाठी आलेले भाविक इ पास सेवेमुळे वैतागले! दर्शनासाठी भर उन्हात भल्या मोठ्या रांगा

    विशेष प्रतिनिधी

    जोतिबा डोंगर : मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे देशातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. ज्योतिबाचे मंदिर देखील मागील आठ महिन्यांपासून बंद होते. नवरात्री सणानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाईचे आणि ज्योतिबाचे दर्शन घ्यायचे असेल तर ई पॉस काढणे सक्तीचे आहे, असे आघाडी सरकारने जाहीर केले होते. एका मोबाईल नंबरवर एकाच व्यक्तीचे रजिस्ट्रेशन केले जाईल आणि दर्शनासाठी आल्यानंतर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सोबत आणणे सक्तीचे होते.

    People who went for jotiba darshan got annoyed due to e-pass service!

    ई पाच चेकिंग केंद्रा मधील लो नेटवर्कमुळे मात्र सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. ज्योतिबाला जाणारे बरेच भाविक हे खेडोपाड्यातून सुद्धा आलेले आहेत, वयस्कर आहेत. बऱ्याच वयस्कर लोकां आपले आधार कार्ड विसरून आले आहेत. तांत्रिक अडचणीं सोबत व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मात्र प्रचंड गोंधळ निर्माण झालेला दिसून येतोय. उन्हातान्हात लोकांना थांबावे लागत आहे. यामुळे वयस्कर लोकांचे हाल होत आहेत. लहान मुलांना मंदिरात प्रवेश नाकारला आहे तरी बरेच लोक आपल्या मुलांना घेऊन येत आहेत. त्यामुळे इ पास सेवा बंद करावी अशी मागणी भाविकांमधून होताना दिसून येतेय.


    अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागणार?


    मंदिरामध्ये प्रवेश करायचा झाल्यास मास्क लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम ठरलेल्या परंपरेनुसार केले जाणार आहेत. पण कोणताही धार्मिक कार्यक्रम भाविकांना पाहता येणार नाहीये. प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर आणि अम्ब्युलन्सची सोयदेखील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दर्शनाची रांग, दर्शनाची जागा वेळोवेळी सॅनिटाइझ केली जात आहे. पण इतक्या सगळ्या व्यवस्था करूनदेखील ही इ पास सेवेमुळे मात्र भाविकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

    People who went for jotiba darshan got annoyed due to e-pass service!

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस