विशेष प्रतिनिधी
ठाणे :- खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्याला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. pengolin Smuggler arrested from Thane
ठाण्यातील वागळे ईस्टेट परिसरातील २२ नंबर सर्कल येथे एक जण वन्यप्राणांच्या अवयवांची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने २६ जानेवारी रोजी सायंकाळी सापळा लावून एका संशयितास ताब्यात घेतले. किरण परशुराम धनवडे असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे.
त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे असलेल्या एका बॅगेत दुर्मिळ सस्तन प्राणी खवले मांजराचे साडे पाच किलो खवले त्याच्याकडे आढळून आले. चौकशीत हे खवले १२ लाख रुपयात विकण्यासाठी आणल्याचे उघडकीस आले. हे खवले कोण खरेदी करणार होते व अटकेतल्या आरोपीने ते कोठून आणले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
pengolin Smuggler arrested from Thane
महत्त्वाच्या बातम्या
- दीपिका पदुकोणने कडाक्याच्या थंडीत असा ड्रेस घातला युजर्स म्हणाले- उर्फी जावेद बनत आहेस
- आकाशगंगेमध्ये गूढ आणि रहस्यमय वर्तुळ अचूक वेळेत गायब होण्यामुळे शास्त्रज्ञ आश्चर्यचकित
- दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती
- प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोरोना उपचाराचा कर्नाटक पॅटर्न
- देशात साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेचे, अमित शाह यांनी मानले आभार